Big Operation Uttar Pradesh ATS Team In Chhatrapati Sambhaji Nagar Suspicion Of Malicious Activity Notice 11 People Crime News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून, उत्तर प्रदेशच्या एटीएस (ATS) पथकाने संभाजीनगरात मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती सभाजीनगर शहरातील 14 जणांना नोटीस दिल्या असून, 15 ते 18 जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली असल्याचे काही पुरावे मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे. 

अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली. तर, या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले होते. तर, अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत उल्लेख बैठकीत झाल्याने तेलंगणा पोलिसांनी तत्काळ ते पुरावे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाकडे पाठवले. बैठकीचे पुरावे मिळताच उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी उत्तर प्रदेशचे एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते, आणि यावेळी त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील 14 जणांना नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र एटीएसने दखल घेतलीच नाही…

जानेवारी महिन्यात देशात पार पडणाऱ्या एका मोठ्या आयोजनाच्या अनुषंगाने काही ठिकाणी त्याविरोधी मोहीम सुरू झाली. या बैठकीला दहशतवादी संघटना इसिसचे समर्थनही करण्यात आल्याचे सुत्रांची माहिती आहे. तपास यंत्रणांमधील सुत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसला यासंदर्भाने पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याची दखलच घेतली गेली नाही. जानेवारी महिन्यातील मोठ्या आयोजनाचे गांभीर्य ओळखून अखेर उत्तर प्रदेश प्रशासनाने लखनौ येथील दहशतवादविरोधी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 153 ए, 153 बी, भादंवि व 13/18 बेकायदेशीर क्रिया (यूएपीए) अधिनियम 1967 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी नुकतेच शहरात येऊन गेले. त्यांनी संशयितांची चौकशी करून नोटीस बजावली आहे. 

यापूर्वी अनेकदा कारवाई…

छत्रपती संभाजीनगर शहरात यापूर्वी देखील विघातक कृत्य करण्याच्या हालचालींबद्दल संशय आल्याने एटीएस पथकाकडून अनेकदा कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. सोबतच, काही दिवसांपूर्वी पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. अशात आता उत्तर प्रदेश एटीएसने शहरात येऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता स्थानिक एटीएस पथकाकडून यावर काही कारवाई होते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

1826 पानांचे पुरावे देऊनही अब्दुल सत्तारांवर कारवाई होईना, तक्रारदराने थेट ईडी कार्यालयासमोरच कापला केक

[ad_2]

Related posts