Nanded Crime News Tractor Fell In Canal Two Youth Died On The Spot Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nanded Crime News : नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, ट्रॅक्टर (Tractor) कालव्यात पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर कालव्याच्या बाजूने जात असतांना ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने झालेल्या अपघातात या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा तांडा शिवारात मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अजय अनिल राठोड (वय 28 वर्ष), लखन प्रकाश राठोड (वय 24 वर्ष)  असे मयत तरुणांचे नावं आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाभरा तांडा येथील अजय राठोड आणि लखन राठोड हे शेतीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन सोनाळा ते चाभरा रस्त्यावरील कालव्याच्या बाजुने जात होते. दरम्यान, अचानक चाभरा तांडा शिवारातील कालव्यात ट्रॅक्टर पडून अपघात झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच परिसरातील इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली. मात्र, कालव्यात पाणी सोडलेलं असल्याने कालवा पूर्ण भरून वाहत होता. त्यामुळे दोघांना वेळेत बाहेर काढणं शक्य झाले नाही आणि दोघेही तरुण कालव्यातच ट्रकटरमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर येताच न आल्यामुळे जागेवरच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

शेताकडे गेले अन् परतलेच नाही…

चाभरा तांडा राहणारे अजय राठोड आणि लखन राठोड नेहमी प्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. याबाबत त्यांनी घरातील सदस्यांना देखील सांगितले होते. त्यामुळे मुलं शेतात गेली असल्याचं त्यांना वाटले. मात्र, रस्त्यात चाभरा तांडा शिवारातील कालव्याजवळ पोहचताच त्यांचा ट्रॅक्टर कालव्यात पडले. विशेष म्हणजे कालव्यात पाणी सोडलेले असल्याने कालवा पाण्याने भरून वाहत आहेत. त्यामुळे दोघेही ट्रॅक्टरसह पाण्यात बुडाले आहेत. नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी अधिक असल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

पोकलनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढले… 

चाभरा तांडा राहणारे अजय राठोड आणि लखन राठोड हे दोघेही ट्रॅक्टरसह कालव्यात बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कालव्यात पाणी अधिक असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शेवटी गावकऱ्यांनी परिसरातील दोन पोकलन मागवले. त्या पोकलनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. याचवेळी अजय राठोड आणि लखन राठोड यांना देखील पाण्यातून बाहेर काढले गेले. मात्र, त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded : चुकीचा फेरफार केला, कपाळावरचं कुंकू पुसलं, पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या तलाठ्याचा बँड लावून जाहीर सत्कार, पीडित महिलेने छापली पत्रिका

[ad_2]

Related posts