[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बुधवारी दुपारी 1.47 वाजता पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या काही भागात 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे धानिवारी पणोतपाडा येथे घराचा काही भाग कोसळला. प्रशासनाने पंचनामा करून आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंप होत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील रहिवासी सध्या वारंवार भूकंपाच्या भितीत जगत आहेत.
पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागात बुधवारी दुपारी 1.47 वाजता ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तलासरी आणि डहाणू तालुक्यातील पूर्वपट्टय़ाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. डहाणू तालुक्यातील आष्टा, रायपूर, सायवन, आंबोली, धानिवारी येथे मोठा धक्का बसला. धानिवारी पणोतपाडा येथील आदिवासी बांधवाच्या घराचा काही भाग भूकंपात कोसळला.
या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंप वारंवार होत असल्याने आणि त्या भूकंपाचे केंद्र वेगवेगळी गावे असल्याने गावातील नागरिकांनी सतर्क राहणेही तितकेच गरजेचे झाले आहे.
हेही वाचा
नवी मुंबईतील केमिकल कारखान्याला भीषण आग
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन 12 जानेवारीला होणार
[ad_2]