MP Bhavana Gawali Notice From It Bjp Lok Sabha Election 2024 Mahant Sunil Maharaj Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhavana Gawali :  महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीची (lok sabha election 2024) तयारी सुरु केली आहे. प्रत्येक उमदेवाराची चाचपणीही सुरु आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण असताना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali ) यांना आयकर विभागाची नोटीस आली. यावरुन आता भाजपवर निशाणा साधला जातोय. पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. लोकसभा उमेदवार म्हणून भाजपला भावना गवळी नको आहेत, त्यामुळे त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली, असे पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज म्हणाले. दरम्यान, महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण संस्थेतील 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याकरिता भावना गवळी यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. 

 सुनील महाराज काय म्हणाले ?

शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना लोकसभेच्या  उमेदवार म्हणून भाजपाची नापसंती आहे. त्यामुळेच भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आली असे मत पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी व्यक्त केले. ते एबीपी माझाशी बोलत होते. भावना गवळी यांना यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात प्रचंड विरोध आहे. हे भाजपच्या लक्षात आले आहे. या वेळेस पोहरादेवीचे शक्तीपीठ व बंजारा समाजपण भावना गवळी  यांच्या मागे उभा राहणार नाही, असे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.

सुनील महाराज निवडणुकीच्या मैदानात – 

या वेळेस मी पोहरादेवी शक्तीपीठाच्या आशीर्वादाने लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुनील महाराज यांनी सांगितले. संजय राठोड हे काही एकटे बंजारा समाजाचे नेते नाहीत, काही नेत्यांपैकी एक नेते आहेत. अशा शब्दात सुनील महाराज यांनी संजय राठोड यांचा समाचार घेतला. 

यंदाची निवडणूक रंगतदार – 

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. पण यावेळे परिस्थिती वेगळी आहे. यावेळी शिवसेनामध्ये फूट पडलेली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले आहेत. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. त्या सध्या सत्तेत आहेत. पण यावेळी होणारी निवडणूक सोपी नसेल… उद्धव ठाकरे यांनीही आपला तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे.  त्याशिवाय महायुतीचा उमेदवारही मैदानात असेल. आता त्यामध्ये सुनील महाराज यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. यवतमाळ येथे बंजारा समाजाच्या मताची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय होतेय? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

[ad_2]

Related posts