[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather Update Today : देशात कुठे ठंडी (Winter) तर कुठे पाऊस (Rain) असं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे, तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यामध्ये पुढील 48 तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं गेलं.
दिल्ली, पंजाबमध्ये दाट धुक्याची चादर
दिल्लीच्या काही भागांमध्ये शुक्रवारी सकाळी दाट धुके पाहायला मिळालं, यावेळी किमान तापमान 9.4 अंश सेल्सिअस होते, असं भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं. हवामान विभागाने आजही दिल्लीत काही ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता असून थंड वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पहाटे पंजाब आणि दिल्लीच्या एकाकी भागात खूप दाट धुके दिसले. दिल्लीच्या काही भागांना दाट धुक्याने वेढले आहे, असे आयएमडीने म्हटलं आहे.
‘या’ राज्याला येलो अलर्ट
देशभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पाहायला मिळत होती. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम देशभरातील हवामानावरही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कर्नाटक राज्य त्याच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, भारतीय हवामान विभाग (IMD) ने येलो अलर्ट जारी केला आहे. कन्नड, उडुपी, कोडागु आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात दक्षिण कोकणात आज आणि उद्या तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
[ad_2]