Coastal Road Update When Will Coastal Code Start Chief Says Minister Eknath Shinde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या कटकटीवर उतारा मिळणार आहे.  जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडचा (Coastal Road)  पहिला टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. मुंबई आयुक्त इक्बाल चहल हे देखील यावेळी उपस्थित होते.  मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण झाले आहे.  जानेवारी महिन्यात कोस्टल रोड खुला होणार आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.  कोस्टल रोडची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोस्टल रोडच्या एका टनेलचं काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस 31  जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. तर  दुसऱ्या टनेलचं काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे .  दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल अशी प्रणाली करण्यात आली आहे.कोस्टल रोडमुळे  वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे.

कोस्टल रोड 31 जानेवारीला सुरु होणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, कोस्टल रोड 31 जानेवारीला सुरु होईल . एमटीएचएल 12 जानेवारीला खुला होईल . 12 मिनिटात रायगड जिल्ह्यात जाता येणार आहे.  हे सर्व विकासाचे प्रकल्प आहे. कोस्टल रोड वरळीपर्यंत न थांबता  वांद्रे – वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार जाता येणार आहे. ही  सर्व रखडलेली काम होती, आधीच्या लोकांनी ही कामं बंद पाडली होती . गतीमान पद्धतीनं आपण काम करतोय.

खवळलेल्या समुद्री लाटांपासून कोस्टल रोड आणि मुंबईला वाचवता येईल?

कोस्टल रोड आणि पर्यायानं मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले. राष्ट्रीय समुद्र विद्यान संस्था या समुद्राचा अभ्यास करणारी यंत्रणेकडून कोस्टल  रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढुळपणा यांचा अभ्यास करणारी यंत्रणा मुंबईच्या समुद्रात कार्यरत केली गेली. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातोय. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते . 

[ad_2]

Related posts