जमीन विक्रीच्या व्यवहारात एकाची २७ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – जमीन विक्रीसाठी व्यवहार ठरवून दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख रुपयांची फसवणूक केली. मोशी येथे डिसेंबर २०२१ ते २८ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.याप्रकरणी रुपेश वासुदेव नाईकरे (वय ३४, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज सरायनाथ रॉय (वय ४८, रा. उद्यमनगर, पिंपरी), अशोक सखाराम टाकसाळ (वय ४१, रा. संतनगर, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोशी येथील दोन जागांचा व्यवहार एक कोटी रुपयांना करण्याचे फिर्यादी यांच्यासोबत ठरवले. फिर्यादीकडून इसार म्हणून ३० लाख रुपये घेतले. त्यानंतर समजुतीचा करारनामा केला. करारनाम्याप्रमाणे आरोपींनी खरेदीखत करून दिले नाही. दरम्यान आरोपी हे फिर्यादी यांना २७ लाख रुपये देणे होते. ते पैसे परत न करता आरोपींनी फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Related posts