India Top Turmeric Farming State And Check Benefits Of Turmeric agriculture News Farmers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Top Turmeric Farming state  : मसाला पिकांमध्ये हळदीला (Turmeric) विशेष स्थान आहे. हळदीची लागवड (Turmeric Farming) देशभरात केली जाते, तर प्रत्येक घरात ती वापरली जाते. हळदीचा वापर मसाला म्हणून केला जातो. याच्या वापराने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हळदीला जेवढे औषधी महत्त्व आहे, तेवढेच धार्मिक महत्त्वही आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. हळदीला बाजारपेठेत खूप मागणी आहे. त्यामुळं तिला चांगला भाव मिळतो. याशिवाय आजकाल हळदीचा वापर अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही केला जातो. 

जगभरात वापरल्या जाणार्‍या हळदीपैकी 80 टक्के उत्पादन भारतात 

जगभरात वापरल्या जाणार्‍या हळदीपैकी 80 टक्के हळदीचे उत्पादन एकट्या भारतात होते. शेतकरी हळदीची लागवड करून चांगला नफाही मिळवत आहेत. खरं तर, ते भारतातील प्रत्येक राज्यात घेतले जाते. अशा परिस्थितीत, भारतातील कोणत्या राज्यात हळदीची सर्वाधिक लागवड होते याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

हळदीचे सर्वाधिक उत्पादन तामिळनाडू राज्यात

भारतात हळदीचे सर्वाधिक उत्पादन तामिळनाडूमध्ये होते. म्हणजेच हळदीच्या उत्पादनात हे राज्य आघाडीवर आहे. येथील शेतकरी दरवर्षी मुबलक प्रमाणात हळदीची लागवड करतात. देशातील एकूण हळद उत्पादनात तामिळनाडूचा वाटा 28.09 टक्के आहे.

हळद उत्पादनात अग्रेसर असलेली चार राज्ये

हळद उत्पादनात अग्रेसर असलेल्या पहिल्या चार राज्यांमध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 22.34 टक्के हळदीचं उत्पादन घेतलं जाते. त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो.  येथील शेतकरी 11.14 टक्के हळदीचे उत्पादन घेतात. आंध्र प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याचा एकूण वाटा 6.35 टक्के आहे.

हळदीचे फायदे काय ?

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. या कारणास्तव बाजारात त्याची किंमत खूप जास्त आहे. त्याच वेळी, हळदीचा वापर कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठी देखील केला जातो. याशिवाय न्यूमोनिया, खोकला, ताप, दमा इत्यादी समस्यांमध्येही डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात. याशिवाय कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर वापरले जाणारे औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो.

महत्त्वाच्या बातम्या:

Hingoli : मराठवाड्यात हळदीची सुवर्णक्रांती, हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणार

[ad_2]

Related posts