[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सोलापूर (पंढरपूर) : शनिवारी झालेल्या पंढरपूरच्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर सडकून टीका केली. नाव न घेता जरांगेंना पडळकर हे अर्धवटराव म्हणाले. “झपाटलेला चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या हातात अर्धवटराव नावाचा एक बाहुला असतो. त्याची तार खेचली तसा तो बोलतो. तसेच, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक अर्धवटराव तयार झालेत, असे पडळकर म्हणाले.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नयेत या मागणीसाठी सोलापूरच्या पंढरपूरमध्ये शनिवारी ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता, याच मेळाव्यात बोलतांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करतांना त्यांचा अर्धवटराव असे उल्लेख करत अप्रत्यक्ष टिका केली. दरम्यान, पुढे बोलतांना पडळकर म्हणाले की,”धनगर, वंजारी एनटी आहेत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. भुजबळांच्या नादी लागून हे समाज उगाच आक्रमक होत आहेत. हे दोन्ही समाज स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्रीय नोकरी शिक्षणातलं ओबीसीतून आरक्षण भोगतात, असेही पडळकर म्हणाले.
गावबंदी संविधानाची पायमल्ली, भीमसैनकांनी सोबत लढावं पडळकरांचे आवाहन
याच सभेत बोलतांना आमदार पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातली. “एकीकडे आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं. दुसरीकडे गावबंदी करायची, आमच्यावर बहिष्कार टाकायचे हे प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहेत.” असं पडळकर म्हणाले. बाबासाहेबांनी ओबीसी हा शब्द पहिल्यांदा वापरल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. बाबासाहेबांना थेट ओबीसी आरक्षण प्रश्नाशी यशस्वीपणे जोडल्याचं पहायला मिळतंय. कोळी बांधवांना ओबीसी ऐवजी एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, अशी भूमिका देखील पडळकर यांनी मांडली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका…
या राज्यात सर्वांना एक न्याय मिळत नाही. ओबीसी बांधवांना काही मिळतं नसताना त्याच्या ताटातून हिसकावून घेण्याचा काम सुरु आहे. मुख्यमंत्री कैकयीची भूमिका घेत आम्हाला वनवासात पाठवायचे काम करीत आहे. तुम्ही राजधर्म पाळा असे म्हणत पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर तोफ डागली.
ओबीसी दाखले वाटायची दुकाने सुरु
ओबीसी खिंडीत गाठून संपवायचा डाव सुरू आहे. एका बाजूला तुमच्या आरक्षणाला धक्क लावणार नाही म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने ओबीसी संपवायचा डाव सुरू आहे. आता ओबीसी दाखले वाटलेत त्याची श्वेतपत्रिका काढा. या महाराष्ट्राच्या सर्व संपत्ती आणि जमिनीचे समान वाटप करा. ओबीसी दाखले वाटायची दुकाने सध्या सुरू झालीत, असेही पडळकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
‘फुलं उधळायला 200 जेसीबी आणि हेलिकॉप्टर, अशी गरीबी आम्हालाही हवी,’ प्रकाश शेंडगेंचा जरांगेना टोला
[ad_2]