पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेला मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरूणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करण्यात आले. पिंपळेगुरव येथे बुधवारी (दि. ३) ही घटना घडली.याप्रकरणी राहुल सुनील मोरे (वय २३, रा. पवनानगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अथर्व शशिकांत देशपांडे (रा. पवनानगर, पिंपळेगुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोरे हे त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत पवनानगर येथील सार्वजनिक रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी अथर्व देशपांडे तिथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर राहुल यांच्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Related posts