( प्रगत भारत । pragatbharat.com)
Golden Rules of Strong Relationship : आपल्या नात्यातील रिलेशन हे विश्वासावर असते. कोणत्याही नात्याचा पाया हा प्रेम आणि विश्वासावर असतो. अनेकदा असे दिसून येते आज-काल नातेसंबंधात दुरावा येताना दिसून येत आहे. काळाच्या ओघात परस्पर समज कमी होऊ लागत आहेत. त्यामुळे चांगल्या नात्यात पती आणि पत्नीला हे संबंध ओझे वाटू लागतात. जोडीदार एकमेकांसोबत गोष्टी शेअर करणे बंद करतात त्यामुळे नाते अधिक कमकुवत होते. पण मजबूत नात्यासाठी जोडप्यांनी एकमेकांसोबत गोष्टी शेअर करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा नातं तुटायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही सोनेरी नियम सांगणार आहोत जे तुम्ही पाळले की, तुमचे नाते अधिक मजबूत होते.
हे 4 Golden Rules पाळा
रागावू नका
जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत काही शेअर करत असेल तेव्हा तुम्ही कोणताही त्रागा करु नये किंवा राग येऊ देवू कना, हा महत्वाचा नियम मनी बाळगा. अनेकदा तुमचा पार्टनर तुमच्यापासून गोष्टी लपवतो. कारण तुम्हाला त्यांचा राग येईल. त्यामुळे त्यांना एकामागून एक खोटे बोलणे भाग पडते. त्यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि पार्टनरचे म्हणणे ऐकून घ्या.
सर्व काही सांगण्याचे वचन द्या
नात्यात काहीही लपवून ठेवू नये. जे काही असेल तर स्पष्टपणे आणि शांततेत मांडा. त्यामुळे एकमेकांवरील विश्वास वाढीला लागतो. त्यातून जोडीदार हा सर्व काही सांगतो. यामुळे त्यांच्यात विश्वास निर्माण होतो. पण जर या सवयी वेळेनुसार बदलू लागल्या तर तुम्ही तुमच्या प्रियकराला वचन दिले पाहिजे की तो तुमच्यासोबत सर्वकाही शेअर करेल.
कायमचे एकत्र राहण्याचे वचन
नातेसंबंधात, जोडप्याने एकमेकांना वचन दिले पाहिजे की, जीवनातील प्रत्येक परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासोबत असाल. नेहमीच साथ द्या आणि जगात तुमच्यावर सर्वात जास्त विश्वास माझा असेल हे दाखवून द्या. जर तुम्ही हे केले तर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत सर्व काही शेअर करेल.
प्रेमाचे वचन द्या
तुमच्या प्रियकराला नेहमी वचन द्या की, तुम्ही त्याच्यावर कितीही रागावलात तरीही तुम्हाला दूर लोटणार नाही. काही चुका करण्याचे टाळा. तुमचे किती प्रेम आहे, हे जोडीदाराला छोट्या छोट्या गोष्टीतून दाखवून द्या. त्यामुळे तुमच्यावरील विश्वास अधिक वाढीला लागेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)