Modi Diplomacy Shakes Pakistan In 2019 Ajay Bisaria Has Revealed The Inside Story Post Pulwama Coercive Diplomacy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली:  2019 च्या फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या (PM Modi)  कूटनितीने पाकिस्तानला (Pakistan) घाम फोडला होता, असा दावा  पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया (Ajay Bisaria)  यांनी पुस्तकात केला आहे.  पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अँगर मॅनेजमेंट’ ( Anger Management: The Troubled Diplomatic Relationship Between India and Pakistan) या पुस्तकातून मोंदीची  मुसद्देगिरी अधोरेखित केली आहे. 

अजय बिसारिया 2019 ची भारत पाकिस्तानमधली परिस्थिती वर्णन करताना आपल्या पुस्तकात म्हटले की, 2019 च्या फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या कूटनितीने पाकिस्तानला घाम फोडला होता. भारतीय लष्कराने तब्बल नऊ क्षेपणास्त्रे पाकिस्तानवर सोडण्याची तयारी केली होती. भारताची ही युद्धसज्जता पाहून तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, पण मोदींनी हा फोन स्वीकारला नाही. त्यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या घरीही पाकिस्तानी अधिकारी पोहोचले होते. ही रात्र  27 फेब्रुवारी 2019 ची होती. हा तोच दिवस आहे जेव्हा भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते.

भारताच्या युद्धसज्जतेने पाकिस्तानी पंतप्रधान  इम्रान खान घाबरले

हा घटनाक्रम पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी त्यांच्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात शब्दबद्ध केला भारताच्या या आक्रमक कूटनितीने आणि कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या शक्यतेने पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या भूमिकेचाही फेरविचार करायला तयार झालं होतं, असाही दावा बिसारिया यांच्या पुस्तकात करण्यात आलाय. भारताच्या या तयारीमुळे, पाकिस्तानला दोनच दिवसात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करावी लागली. पंतप्रधान मोदींनी या 27 फेब्रुवारीच्या या रात्रीचा उल्लेख ‘कत्ल की रात’ असा केल्याचा दावाही अजय बिसारिया यांच्या पुस्तकातून करण्यात आलाय. 

27 फेब्रुवारीची रात्र ठरली असती ‘कत्ल की रात’

अजय बिसारिया हे त्यावेळी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त होते. त्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलायचे, असा निरोप  अजय बिसारिया यांना त्याच रात्री आला होता. दुसऱ्या दिवशी  इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत अजित बसारियांना नरेंद्र मोदींशी शांतता राखण्याचे आवाहन करणारा निरोप दिल्याचे मान्य केले होते. त्यानंतर भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानने सोडले. एवढच नाही तर त्यानंतर देखील इम्रान खान यांनी मोदींशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु मोदींनी ते टाळले, अजय बिसारिया यांनी त्यांच्या पुस्कत अनेक गौप्यस्फोट केले आहे. पुलवाम हल्ला ते पाकिस्ताननी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबध सुधरवण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.  पाकिस्तानला कारवाईचा इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 साली एका रॅलीमध्ये म्हटले होते की, सुदैवाने पाकिस्तानने कमांडर अभिनंदनला सोडले अन्यथा ती रात्र ‘कत्ल की रात्र’ ठरली असती. 

[ad_2]

Related posts