Maruti Suzuki Alto K10 Price Get This Car Under 5 Lakhs Offers Upto 33 85 Km Mileage

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maruti Suzuki Alto K10 : अनेक ऑटो कंपन्यांनी जानेवारी 2024 पासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत, असे असूनही कमी बजेट असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी अजूनही अशी एक कार आहे, ज्याची किंमत 4 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आता प्रश्न पडतो की, ही कार नेमकी कोणती? तर मारुती सुझुकीच्या या स्वस्त कारचं नाव Alto K10 आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10 कमी किंमतीत तर आहेच, पण मायलेजच्या बाबतीत देखील ही कार मागे पडत नाही. या कारची किंमत आणि मायलेज किती आहे आणि या कारमध्ये कोणती सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत? जाणून घेऊया.

Alto K10 या कारचं मायलेज किती? (Alto K10 Mileage)

मारुती सुझुकीची ही कार तुम्हाला पेट्रोल (मॅन्युअल), पेट्रोल (ऑटो गियर शिफ्ट) आणि सीएनजी (मॅन्युअल) या तीन पर्यायांमध्ये मिळेल. पेट्रोल इंधनासह येणारा मॅन्युअल प्रकारात ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 24.39 किलोमीटरपर्यंत चालेल.

ऑटो गियर शिफ्टसह येणारी पेट्रोल कार एका लिटरमध्ये 24.90 किलोमीटरपर्यंत चालेल. सीएनजी पर्यायामध्ये येणारं मॅन्युअल मॉडेल एक किलो सीएनजीमध्ये 33.85 किलोमीटरपर्यंत चांगलं मायलेज देईल.

या कारची किंमत खूपच कमी (Alto K10 Price)

मारुती सुझुकीच्या या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 3 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. त्याच वेळी, या वाहनाच्या टॉप व्हेरियंटची किंमत 5 लाख 96 हजार रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Alto K10 सुरक्षा वैशिष्ट्ये (Alto K10 Safety Features)

अर्थात, या कारची किंमत खूपच कमी आहे, परंतु असं असतानाही मारुती सुझुकीने या कारमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये (Alto K10 Safety Features) दिली आहेत. या कारमध्ये तुम्हाला ड्युअल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन म्हणजेच ABS सपोर्टसह EBS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रियर डोअर चाइल्ड लॉक आणि हाय स्पीड अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.

मारुतीच्या या कारचा प्लॅटफॉर्म (New Maruti Suzuki Alto K10 Platform)

न्यू मारुती सुझुकी अल्टो K10 या कारमध्ये पाचव्या जनरेशनचा हार्टेक्ट प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. यामध्ये 13 इंचांचे व्हील्स देखील देण्यात आले आहेत, जे या कारला चांगला ग्राऊंड क्लीअरन्स देतात. यामुळे ही कार खराब रस्त्यांवर देखील सहजपणे चालवता येईल.

हेही वाचा:

SUV TATA Punch EV : भारतातली सगळ्यात लहान इलेक्ट्रिक कार SUV TATA Punch EV चे फिचर्स समोर, एकदा चार्ज केली की 300 किमी धावणार; किंमत किती असणार?

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts