[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पणजी : बंगळुरूतील एका स्टार्ट अप कंपनीची सीईओ असलेल्या महिलेने गोव्यात आपल्याच चार वर्षांचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. महिलेने रुममधून चेकआऊट केल्यानंतर साफसफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग दिसले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. सूचना सेठ असं तिचं नाव आहे.

गोवा पोलिसांनी याबाबत कर्नाटक पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी सूचना सेठला अटक केली. दरम्यान मुलगा आणि त्याच्या वडिलांची भेट होऊ नये, यासाठी महिलेने त्याची हत्या केल्याचं समोर आलं.

का केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेली आरोपी महिला सूचना सेठ हिचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. 2019 मध्ये आरोपी मगिलेनं एका मुलाला जन्म दिला होता आणि 2020 मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल, असे आदेश न्यायालयानं दिले होते.

न्यायालयाच्या निर्देशांनंतर आरोपी महिला दबावाखाली आली. आपल्या मुलानं पतीला भेटू नये, अशी महिलेची इच्छा होती. त्यामुळे तिनं आपल्या मुलालाच संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेनं कट रचला, शनिवारी मुलासह गोवा गाठलं आणि तिथे जाऊन आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली. आपल्या मुलालाच संपवलं चर पती आपल्या मुलाला भेटूच शकणार नाही, असं त्या महिलेला वाटत होतं. त्यामुळेच महिलेनं मुलाची हत्या केली.

असा आहे हत्येचा घटनाक्रम

मुलाने आपल्या आईची हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, पण एका आईनेच तिच्या मुलाची हत्या केल्याची घटना गोव्यात घडलीय.

शनिवारी सूचना सेठ यांनी त्यांच्या मुलासह गोव्यातील कँडोलिममधील हॉटेलमध्ये चेक इन केलं.

सोमवारी सूचना सेठ यांनी चेक आऊट केलं. पण चेक आऊट करताना त्या एकट्याच होत्या.

बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याची सेठ यांनी हॉटेलला विनंती केली.

हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना विमानाने प्रवास करण्याचा सल्ला दिला, पण टॅक्सीनेच जाण्यासाठी सेठ ठाम होत्या.

सेठ या चेकआऊट करताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नसल्याचं हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आलं.

हाऊस कीपिंगला सेठ यांच्या खोलीत रक्ताचे डागही आढळले.

गोवा पोलिसांनी तातडीने टॅक्सीचालकाद्वारे सेठ यांच्याशी संपर्क केला.

त्यावेळी मुलगा आपल्या मित्राकडे असल्याचा दावा सेठ यांनी केला. पण सेठ यांनी दिलेला पत्ता हा खोटा असल्याचं उघड झालं.

गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा टॅक्सीचालकाशी संपर्क साधला आणि त्याला कोकणी भाषेत काही सूचना दिल्या.

बंगळुरूपासून 200 किमी दूर असलेल्या चित्रदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सी नेण्याच्या सूचना पोलिसांनी त्याला दिल्या.

चित्रदुर्ग पोलिसांनी सेठ यांची बॅग तपासली असता त्यांना त्या बॅगेत त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला. त्यानतंर पोलिसांनी सेठ यांना अटक केली.

ही बातमी वाचा:

आई आहे की राक्षशीण? चार वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, बॅगेत भरलं अन्; AI कंपनीची CEO अटकेत

[ad_2]