Weather Update Today Rain Prediction Imd Alert In Tamil Nadu Karnataka Andhra Pradesh Uttar Pradesh Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IMD Weather Update Today : देशातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळाली आहे. दक्षिण भारतासह कोकणाला पावसानं झोडपलं. संपूर्ण उत्तर भारतात थंडी कायम आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूसह दक्षिण भारतातील काही भागात पाऊस थांबताना दिसत नाहीय. थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी केला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील नागरिकांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. पुढील 48 तासात देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे.

11 जानेवारीपर्यंत पावसाची रिमझिम कायम

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात गेल्या 24 तासांत कडाक्याची थंडी आणि धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आजपासून तापमानात किंचित बदल होताना पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतातील थंडीचा जोर आता ओसरताना पाहायला मिळणार आहे. उत्तर पश्चिम, मध्य भारतात आज कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. दक्षिण भारतात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. देशाच्या विविध भागात 11 जानेवारीपर्यंत पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. 

पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता

पुढील 24 तासात तामिळनाडूच्या काही भागात आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याशिवाय कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो. गुजरातच्या पूर्व भागात, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि धुक्याचा कहर

उत्तर प्रदेशात हवामान बदलताना दिसत आहे. पाऊस आणि धुक्याचा कहर सुरु आहे. गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस झाला हे. आज 10 जानेवारीला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीसह धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये आज तापमान 6 ते 7 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.  दिल्ली, उत्तर प्रदेशा आणि राजस्थानमध्ये आज अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. 

बर्फवृष्टी अभावी पर्यटकांची निराशा

जानेवारी महिन्यात हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीची फारच कमी शक्यता आहे. आगामी काळात फक्त हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतीय भागातच बर्फवृष्टी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात राजधानी शिमलामध्ये बर्फवृष्टीची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात बर्फवृष्टी पाहण्यासाठी शिमल्यात येणाऱ्या पर्यटकांना निराश व्हावं लागणार आहे.

[ad_2]

Related posts