Technology News Instagram Hidden Tricks That You All Must Know

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tips and Tricks For Instagram : दिवसभर कितीतरी तास तुम्ही (Instagram)  इंस्टाग्रामचा वापर करत असाल. मात्र तरीसुद्धा या instagram मध्ये अशा बरेच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाही आहेत. तर आज आपण याच इंस्टाग्रामशी जोडलेल्या  तीन भन्नाट हिडन ट्रिक बद्दल माहित करून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या नवीन व्हिडिओ ट्रिक्सबद्दल.. 

सिनेमॅटीक व्हिडीओ शूट करु शकाल

ॲप्पल त्याच्या आयफोनमध्ये सिनेमॅटिक मोड देतो ज्याच्यामुळे युजर्स त्यांचे व्हिडिओ या मोडमध्ये रेकॉर्ड करू शकतील. मात्र अँड्रॉइड फोन मध्ये युजर्सना ही सुविधा मिळत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का तुम्ही इंस्टाग्रामचा वापर करून सिनेमॅटिक व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. आता ते कशाप्रकारे करतात? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तेच आता आपण समजून घेऊ. 

पहिली ट्रिक कोणती?

त्यासाठी तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राममध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करावा लागेल आणि स्टोरी फिल्टरमध्ये एकदम शेवटी यावं लागेल. तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून ‘फोकस’ सर्च करा आणि फोटोमधील मार्क ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन मध्येसुद्धा सिनेमॅटिक मोडवर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. तुम्ही ब्लरला पण ऍडजेस्ट करू शकतात. 

दुसरी ट्रिक कोणती?

दुसरी हिडन ट्रिक म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाचा मेसेज त्याला कळायच्या अगोदर रीड करू शकता. अर्थात तुम्ही मेसेज रीड केल्यावर सिन असा स्टेटस त्याला दिसणार नाही. यासाठी तुम्हाला त्या माणसाच्या प्रोफाईलला रेस्ट्रिक्ट करावे लागेल. ज्यामुळे तुम्ही त्याचा मेसेज अशा पद्धतीने वाचू शकता. प्रोफाईल रेस्ट्रिक्ट केल्यानंतर मेसेज रिक्वेस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या व्यक्तीचा मेसेज वाचू शकता. 

तिसरी ट्रिक कोणती?

तिसरी ट्रिक म्हणजे जर तुमचा मेसेज कोणी सीन करत नाहीये किंवा टाईम वर रिप्लाय देत नाही तर तुम्ही तुमचा मेसेज एकदा गिफ्ट फॉरमॅटमध्ये त्याला पाठवू शकता. या कारणामुळे समोरच्या व्यक्तीला तुमचा मेसेज चा एक वेगळा चॅट बॉक्स दिसेल. गिफ्ट फॉरमॅटमध्ये तुम्हाला मेसेज पाठवताना मेसेज टाईप केल्यानंतर त्याच्या लेफ्ट साईडला दिसणाऱ्या एका सर्च बटन वर क्लिक करावे लागेल. आणि गिफ्टच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचा मेसेज एका गुप्त फॉरमॅटमध्ये समोरच्याला जाईल. आता समोरच्या व्यक्तीला तुमचा मेसेज बघण्यासाठी तो बॉक्स ओपन करावा लागेल. बॉक्स ओपन केल्यानंतर तो माणूस तुम्ही पाठवलेला मेसेज बघू शकतो. 

मेटा इंस्टाग्राममध्ये वेळोवेळी नवीन फिचर्स जोडत असतं. या नवीन फिचर्समुळे युजरचा एक्सपेरियंस चांगला व्हावा हाच त्यामागचा उद्देश असतो. येणाऱ्या काळात कंपनी अजून एक नवीन फिचर अॅड करणार आहे. या फिचरमुळे प्रोफाइलमधील पिक्चर तुम्ही झूम करून पाहू शकता. हा आणि असे अनेक विचार कंपनी येत्या काळात युजर्सना देऊ शकते.

इतर महत्वाची बातमी-

CES 2024 : लॉंच झाला आहे Android आणि Windows दोन्हींवर चालणारा लॅपटॉप, जाणून घ्या नेमकं कसं करतो काम?

[ad_2]

Related posts