Union Finance Minister Nirmala Sitharaman Will Present The Interim Budget On 1st February Parliament Budget Session Begin From 31st January Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी रोजी  देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करतील. 31 जानेवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून 9 जानेवारीपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या बजेटमध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात विधान करावे, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष करत होते. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 100 हून अधिक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले.

 

हेही वाचा : 

पंतप्रधान मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन, पाहा संपूर्ण दौरा



[ad_2]

Related posts