Mumbai Trans Harbour Link Atal Setu Inauguration Uddhav Thackeray Mla Will Not Attend The Programme Pm Modi Mumbai Visit Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे  (Nhava Sheva Atal Setu) उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Maharashtra)  यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकल आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याने  ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी ठाकरे गटाला ऐनवेळी निंमत्रण देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत  आहे. ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या वतीने निमंत्रण येऊन सुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

स्थानिक आमदारांना डावल्याचा ठाकरे गटाचा आरोप

उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमांना काही जणांना काल रात्री तर काही जणांना सकाळी निमंत्रण पाठवण्यात आसे आहे. शासनाच्या कार्यक्रमाची जी निमंत्रण पत्रिका असतात त्यावर स्थानिक आमदार आणि खासदारांचे नाव असणे आवश्यक आहे. मात्र निमंत्रणपत्रिकेवर नजर मारल्यास शिवसेने ठाकरे गटाच्या स्थानिक खासदारांचे नाव नाही. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत नाही. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मंत्र्याची नावे आहेत. सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावे आहेत. मात्र त्या ठिकाणचे स्थानिक खासदार अरविंद सावंताचे नाव नाही. शिवाय माजी मंत्री असलेले आदित्य ठाकरे, तसेच आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सुनील शिंदे, सचिन आहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत.

मोदी मुंबईत जवळपास 30 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण करणार

मोदी मुंबईत जवळपास 30 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.

हे ही वाचा :

PM Modi In Maharashtra:  महाराष्ट्रात मोदींचा झंझावात, नाशिकमध्ये मोदींचा रोड शो; आठ तासात देणार राज्याला 30 हजार कोटींची भेट

 

[ad_2]

Related posts