Indian Rail News How Indian Rail Already Offering 55 Percent Discount To Every Passenger Says Ashwini Vaishnaw

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

indian Railway : तुम्ही भारतीय रेल्वेने (indian Railway) प्रवास केल्यास, तुम्हाला प्रत्येक प्रवासात भाड्यात 55 टक्के सूट मिळते. त्यामुळेच रेल्वेने प्रवास करणे आजही सर्वात स्वस्त वाहतुकीच्या पर्यायांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की तुम्हाला एवढी मोठी सूट कशी मिळते? आम्ही तुम्हाला सांगतो, त्याआधी तुम्हाला हे कळले पाहिजे की ही 55 टक्क्यांची सूट नेमकी आली कुठून?

भारतीय रेल्वेने प्रवास करणं स्वस्त

भारतीय रेल्वेने प्रवास करणे अजूनही इतर अनेक वाहतुकीच्या साधनांपेक्षा खूपच स्वस्त आहे. याचे कारण म्हणजे रेल्वे प्रत्येक प्रवाशाला भाड्यात 55 टक्के सवलत देते. आता ज्येष्ठ नागरिकांना कोविड पूर्वीप्रमाणे अतिरिक्त सवलत मिळेल की नाही? याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ‘बुलेट ट्रेन’च्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादमध्ये आले होते. तेथे, जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारले की सरकार कोविड -19 पूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि मीडिया कर्मचार्‍यांना दिलेली भाडे सवलत पुन्हा सुरू करेल का? भारतीय रेल्वे आधीच प्रत्येक प्रवाशाला भाड्यात 55 सवलत देत असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 

पीटीआयच्या एका बातमीनुसार, मार्च 2020 मध्ये देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर गाड्यांची वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. यापूर्वी, रेल्वे मान्यताप्राप्त पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात 50 टक्के सवलत देत असे. जून 2022 मध्ये रेल्वेचे कामकाज पूर्णपणे सुरू झाले, परंतु रेल्वे मंत्रालयाने या सवलती पुन्हा सुरू केल्या नाहीत. तेव्हापासून ही सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. तर संसदेच्या दोन्ही सभागृहातही याबाबतचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

सरकार 100 रुपयांपैकी 55 रुपये देते

अहमदाबादमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान रेल्वे मंत्री म्हणाले की, “कोणत्याही ठिकाणी ट्रेनने पोहोचण्याचे भाडे 100 रुपये असेल तर भारतीय रेल्वे प्रवाशांकडून फक्त 45 रुपये आकारते. त्याला आधीच 55 रुपयांची सूट दिली जात आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील एका आरटीआय कार्यकर्त्याने रेल्वेकडे ज्येष्ठ नागरिकांच्या कमाईचा तपशील मागितला होता. 2022-23 मध्ये सुमारे 15 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केल्याची माहिती सरकारने दिली होती. यातून रेल्वेला सुमारे 2,242 कोटी रुपयांची कमाई झाली.

पैसा येतो कुठून?

भारतीय रेल्वेला केवळ प्रवासी भाड्यातून उत्पन्न मिळत नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर अनेक स्त्रोत आहेत. यामध्ये मालाची वाहतूक, रेल्वे स्थानकांवरील जाहिराती, खाद्यपदार्थांच्या निविदा, रेल्वे कारखान्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या मालाची निर्यात इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय, रेल्वेचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे राहावे, यासाठी सरकार त्या गाड्यांमध्ये एसी कोच बसवते ज्यांचे भाडे सामान्य भाड्यापेक्षा खूप जास्त असते. अशाप्रकारे, रेल्वे भाडे संकलन आणि खर्च यांच्यातील तफावत कमी करण्याचे काम करते.

महत्त्वाच्या बातम्या:

Indian Railway : भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 1646 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज

[ad_2]

Related posts