Health Tips How to keep weight under control for women after forty nz

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Healthy Women : हल्ली सगळ्यांनाच वजन नियंत्रणात ठेवण्यात अडचणी येतात. वजन नियंत्रणात रहावे यासाठी प्रत्येकजण मेहनत घेताना दिसतो. या प्रयत्नांतून काही जणांचे वजन आटोक्यात येते, तर काहीजण योग्य आहार घेऊन, दररोज व्यायाम करुनही वजनावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. मग अशा वेळेस आपली खूप चीडचीड होते. ही समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त पाहायला मिळते. 

चाळीशी ओलांडल्यानंतर वजनाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने जास्त. पण हे असे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमच्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. (Health Tips How to keep weight under control for women after forty nz)

महिलांचे शरीर अनेक बदलांमधून जात असते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे विविध हार्मोन्स आणि मासिक पाळीत होणारे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. गर्भधारणेनंतर इतर अनेक घटक देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. 

40 नंतर वजन नियंत्रणात कसे ठेवावे?

1. जर तुम्हाला चटपटीत पदार्थ खायचे आहेत, तर असल्यास तुम्ही बदाम, अक्रोड, काजू  आणि सूर्यफुलाच्या बिया खात जा.

2. आपल्या शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी आणि चयापचय प्रक्रिया वाढवण्यासाठी भरपूर प्रथिनांची गरज असते, त्यामुळे प्रथिनांचे सेवन वाढवा.

3. दिवसातून फक्त 30 मिनिटे व्यायाम करून, तुम्ही वजन कमी करू शकता, ताकद आणि लवचिकता मिळवू शकता.

4. फायबर युक्त आहार घ्या. दिवसातून एक किंवा दोनदा आपल्या आहारात सब्जा आणि चियाच्या बिया यांचा समावेश करा.

5. पौष्टिकतेच्या कमतरतेशी लढण्यासाठी व्हिटॅमिन, कॅल्शियमयुक्त आहार घ्या.

6. बाहेरचे खाणे टाळा, दररोज ताजी फळे आणि ताज्या भाज्या खा, किमान 8 तास चांगली झोप घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Related posts