Odisha Train Accident Indian Railway Using Artificial Intelligence Identify Bodies Balasore Train Accident Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय रेल्वे जीव गमावलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) चालणारी वेबसाइट आणि सिम कार्ड ट्रायंग्युलेशन (SIM Card Triangulation) वापरत आहे.

बेपत्ता लोकांचा शोध घेणे हे आमचे ध्येय : रेल्वेमंत्री

ओडिशा रेल्वे अपघातातील अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे की, “बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या नातेवाईकांना भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही.”

ओडिशा रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. यापैकी 193 मृतदेह भुवनेश्वर येथील एम्समध्ये तर 94 मृतदेह बालासोर येथील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले होते. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले की, ओडिशाच्या विविध रुग्णालयांमध्ये 200 हून अधिक लोक उपचार सुरु असून इतर जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोमंडल ट्रेन दुर्घटना कधी आणि कशी घडली?

कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीवर धडकली. अपघातात त्याचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. त्यानंतर त्याचवेळी जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांशी त्याचे काही डबे आदळले. अपघातामागे मानवी चूक, सिग्नल बिघाड आणि इतर संभाव्य कारणांचा शोध सुरू आहे. ते लवकरच उघड होईल.

रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू आहे, मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि दोषीवर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, दोषींना शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही.

मानवी चुकीमुळे घडला अपघात?

या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे (Electronic Inter Locking System) घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts