Lok Sabha Election BJP Will Be Contested In Mumbai North North West North East North North Central South Central South Who Will Be Candidate Of South Mumbai Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : यंदाचं वर्ष निवडणुकांचं (Lok Sabha Election)  वर्ष असणार आहे. अशातच याच नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) अनेक महत्त्वाच्या मतदारसंघासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेतील बंडानंतर भाजपचे (BJP) सर्वाधिक लक्ष हे सध्या मुंबईवर आहे. मुबंईतल्या (South Mumbai)  चार लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. मुंबईतील व्यावसायिक भाग आणि उच्चभ्रू वस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी भाग आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत भाजप चार तर शिवसेना एकनाथ  शिंदेंना गटासाठी दोन जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईची जागा लढवण्यावर ठाम आहे. तर शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई, आणि  दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्याची शक्यता आहे.  मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण यावरून रंगली चर्चा रंगली होती मात्र ही जागा भाजप लढवण्यावर ठाम आहे. 

 मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण?

दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईतील हायप्रोफाइल लोकसभा मतदारसंघ. याच मतदारसंघावरून महाविकास आघाडीत फुल टू राडा सुरू आहे. दक्षिण मुंबईतून कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे.  2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं जिंकली. त्यावेळी शिवसेना मात्र एकसंध होती आणि शिवसेना-भाजपा युती होती. मात्र, आता शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.  

शिवसेनेचा पारंपारिक मतदार भाजपला स्वीकारणार?

दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. हा शिवसेनेचा पारंपारीक मतदार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर  त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भलामोठा मराठी पट्टा कितपत स्विकारेल हा मोठा प्रश्नच आहे. लालबाग, परळ म्हणजे, एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येत वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे या पट्ट्यात भाजपला  कितपत पसंती मिळेल हा प्रश्नच आहे. अशातच इथे मनसेनं उमेदवार दिला, तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं. आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा :

Vijay Wadettiwar On Milind Deora: मिलिंद देवरा निवडून येणे तर दूरच, त्यांना साधे तिकीटही मिळणार नाही; विजय वडेट्टीवारांचा विश्वास

[ad_2]

Related posts