( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने- चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होते. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती 70 हजार रुपये प्रति तोळावर जाण्याची शक्यता होते. मात्र आता सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. दरम्यान भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. गुडरिर्टनस या वेबसाइटनुसार, आज 17 जानेवारी 2024, रोजी बुधवारी, 22 कॅरेट सोन्याच्या चांदीची किंमत प्रति तोळा 5805 रुपये आहे आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे.
जाणून घ्या सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 47,490 रुपये प्रति तोळा आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 63,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मंगळवारी सकाळी प्रति तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 63,440 रुपये होता. तर आज बुधवारी हा दर 63,330 रुपये आहे.
चांदीच्या दरातही घसरण
आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी (17 जानेवारी 2024) चांदी 300 रुपयांनी स्वस्त झाली. आज मुंबईत चांदीचा दर 76,300 रुपये प्रति किलो आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये होता.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,017 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 57,017 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,200 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 57,017 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,200 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,017 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,200 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप विकसित करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ या अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची शुद्धताच तपासू शकत नाही तर संबंधित तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक फसवणूक झाल्याचे आढळल्यास, ग्राहक त्वरित अॅपद्वारे तक्रार करू शकतात. किंवा अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला दाखल केलेल्या तक्रारीची तत्काळ माहिती मिळेल.