[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पिंपरी-चिंचवड, पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेचा वापर करून गांजाची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या टोळीचा पर्दाफाश केलाय. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एक कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कृष्णा शिंदे, अक्षय मोरे, हनुमंत कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नीदेवल शर्मा, सन्नीदेवल भारती आणि सौरभ निर्मलला बेड्या ठोकण्यात आल्या.
या आरोपींकडून दोन रुग्णवाहिका, चार मोबाईल आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे. रावेत पोलीसांच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. यात कृष्णा शिंदे, अक्षय मोरे आणि हनुमंत कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत, त्यांच्याकडून 30 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींनी देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे यांच्याकडून गांजा आणायचा. तो सौरभ निर्मल यास विकणार असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी देवी प्रसादला अटक करण्यात आलीये. त्याच्याकडून 50 लाख 20 हजारांचा 50 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. विविध छापेमारीत एकूण 1 कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा रूपीनगर चिखलीत विक्री केली जाणार होती. रुग्ण वाहिकेतील केल्या जाणाऱ्या गांजा विक्रीत आणखी कोणाचा हात आहे, याचा ही तपास पोलिसांकडून केला जातोय.
शक्कल लढवली पण फसलीच…
गुन्हेगार गुन्हे लपवण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यात अनेक गुन्हेगार यशस्वी होतात तर काही गुन्हेगारांचा गुन्हा फसतो. पुण्यात सध्या गांजाच्या तस्करीचं प्रमाण वाढत आहे. मात्र या गुन्ह्यात सापडू नये, म्हणून या आरोपींनी थेट कोणत्याही कार, टेम्पोता वापर न करता थेट रुग्णवाहिकेचा वापर करुन गांजाची तस्करी केली. आरोपींनी ही शक्कल लढवली मात्र पोलिसांनी त्यांचा प्लॅन पोलिसांनी चांगलाच हाणून पाडला.
तस्करांवर कस्टम विभागाची करडी नजर
सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि जांगाची तस्करी होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. त्यात आतापर्यंत लाखो रुपयांचा गांजा पुणे शहरात जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस,रेल्वे पोलीस आणि कस्टम या विभागांची यांची तस्करांवर करडी नजर असल्याचं कारवायांमधून दिसून येत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर उद्या सहा तास वाहतूक बंद राहणार; प्रवास करण्यापूर्वी आजच नियोजन करा!
[ad_2]