Arvind Kejriwal Not Appear Before Ed Despite Fourth Summon Says Their Aim Is To Arrest Me Aam Aadmi Party Delhi Liquor Scam Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arvind Kejriwal ED Summon: नवी दिल्ली : ईडीकडून (ED) अरविंद केजरीवालांना (Arvind Kejriwal) धाडण्यात येणाऱ्या समन्सचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. ईडीकडून आतापर्यंत अरविंद केजरीवालांना चार समन्स धाडण्यात आले असून आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले. पण आजही अरविंद केजरीवालांनी ईडी चौकशीला हजर राहणं टाळलं आहे. केजरीवाल यांनी ईडीला उत्तर पाठवलं असून अटक करणं एवढं एकच ईडीचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम आदमी पार्टीचं (AAP) म्हणणं आहे की, ईडीला केजरीवाल यांना लोकसभा प्रचार करण्यापासून रोखायचं आहे. 

चौथ्या समन्सवरही दिल्लीचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडी (ED) समोर हजर झाले नाहीत. त्याला अटक करणं हे ईडीचं उद्दिष्ट असल्याचं त्यानं आपल्या जबाबात लिहिलं आहे. आम आदमी पार्टीनं (AAP) म्हटलं आहे की, ईडी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखू इच्छित आहे. केजरीवाल हे आरोपी नसल्याचं ईडीनं आपल्या आरोपपत्रात लिहिलं आहे, तर मग त्यांना समन्स का पाठवतायत? आणि त्यांच्या अटकेची तयारी का करतंय? असा प्रश्न आपनं विचारला आहे. 

आम आदमी पार्टीनं म्हटलं की, ‘भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या भ्रष्ट नेत्यांची प्रकरणं बंद केली जातात. आम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही, आमचा एकही नेता भाजपमध्ये जाणार नाही. ईडीनं यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि यावर्षी 3 जानेवारीला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु तीनही वेळा केंद्रीय एजन्सीसमोर हजर झाले नाहीत आणि समन्स बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.”

अरविंद केजरीवाल गोव्याच्या दौऱ्यावर? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गोव्याला रवाना होऊ शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात केजरीवाल 18, 19 आणि 20 जानेवारी रोजी गोव्यात मुक्काम करतील आणि तिथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. यासोबतच अरविंद केजरीवाल गोव्यात एका जाहीर सभेलाही संबोधित करु शकतात. 

समन्सकडे सतत दुर्लक्ष करतंय ‘आप’

यावर्षी 16 एप्रिल रोजी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अरविंद केजरीवाल यांची जवळपास 9 तास चौकशी केली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचं कारण देत ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. यानंतर, 18 डिसेंबर रोजी, ईडीनं त्यांना पुन्हा समन्स जारी केलं आणि 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितलं, परंतु मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तेव्हाही ईडीसमोर हजर होणं टाळलं. अशातच ईडीनं चौथं समन्स बजावत आज अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आजही अरविंद केजरीवाल ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. 

[ad_2]

Related posts