Maratha Reservation Distribution 18 Thousand Kunbi Certificates Out Of 32 Thousand Kunbi Records In Marathwada Special Campaign Will Be Implemented Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींचे (Kunbi Records) प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने पाऊल उचलायला सुरुवात केलीय. मराठवाड्यातील ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, त्या गावातील सर्व पात्र लोकांची यादी गावस्तरावर लावण्यात आली आहे. गावोगावी दवंडी दिली जात आहे. आतापर्यंत मराठवाड्यात (Marathwada) 32 हजार नोंदी सापडल्या आहेत, त्यातील 18 हजार लोकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित लोकांनाही लवकरात लवकर हे प्रमाणपत्र मिळावेत यासाठी पुढचे 15 दिवस मराठवाड्यात विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड (Madhukarraje Ardad) यांनी दिली आहे.

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे कुणबी जात प्रमाणपत्र करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार कुणबी नोंदी आढळलेल्या लातूर तालुक्यातील 15 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी आज तालुक्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर तालुक्यात कासरगाव, खंडाळा, खुलगापूर, खुंटेफळ, कोळपा ममदापूर, मांजरी, मुरुड अकोला, पिंपळगाव अंबा, रामेश्वर, सावरगाव, एकुर्गा, हिसोरी, पिंपरी अंबा व वाडीवाघोली अशा एकूण 15 गावांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदीची माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://latur.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.

नोंदींवरुन वारस शोधण्याचा प्रयत्न…

कुणबी नोंदी धारकांच्या वारसांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याचे काम सद्यःस्थितीत सुरु आहे. आढळून आलेल्या नोंदींवरुन वारस शोधण्यासाठी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभागातील खासरा पहाणी, पाहणीपत्रक, कुळ रजिष्टर, जुने फेरफार, सातबारा, टिपण, गुणाकार बुक, योजना व सलेवार या अभिलेख्यांच्या आधारे अर्जदारांना मदत होत आहे. 

‘या’ गावांमध्ये भरणार शिबिर

लातूर तालुक्यात कासरगाव, खंडाळा, खुलगापूर, खुटेफळ, कोळपा, ममदापूर, मांजरी, मुरुड अकोला, पिंपळगाव अंबा, रामेश्वर, सावरगाव, एकुर्गा, हिसोरी, पिंपरी अंबा व वाडीवाघोली या 15 गावांमध्ये 18 जानेवारी रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये कुणबी नोंदीधारक यांच्या वारसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि महाभूमी संकेतस्थळावरून आवश्यक अभिलेखे उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच कुणबी नोंदीधारक यांच्या वारसांनी जास्तीत जास्त प्रमाणात कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

सरकारला भ्रमात ठेवणार अन् गनिमी कावाने मुंबई गाठणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

[ad_2]

Related posts