ram mandir ayodhya pran pratishtha Uttar Pradesh 22nd january 2024 half day holiday in central offices schools closed in many states including up for consecration know all details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Ayodhya: अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी (Lord Sri Rama) अयोध्या (Ayodhya) नगरी नववधूप्रमाणे सजली आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. 140 कोटी भारतीयांच्या मनात राम नामाचा जप सुरू आहे. अनेकजण हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत. आता केवळ चारच दिवस बाकी असून 22 जानेवारीला रामललाची विधीवत पूजा अर्चांसह अभिषेक झाल्यानंतर अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अशातच या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत ‘हाफ डे’ ची घोषणा केली आहे. 

रामजन्मभूमीच्या श्री राम मंदिरात रामललाच्या अभिषेकासाठी आता 100 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आलं आहे. आता फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला आहे. 22 जानेवारी रोजी, देशातील प्रत्येकजण रामललाचा अभिषेक पाहू शकतो, अनुभवू शकतो. त्यामुळे 22 जानेवारीला मध्यवर्ती कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असंही केंद्र सरकारनं गुरुवारी जाहीर केलं आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचाही समावेश आहे. दरम्यान, केंद्राच्या या घोषणेनंतर अशी चर्चा सुरू आहे की, 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक सोहळा थेट पाहण्याचा मोठा विक्रम देशात होऊ शकतो. 

राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान

गुरुवारी, 18 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे. गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशात ATS ची मोठी कारवाई; 3 संशयित ताब्यात

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts