( प्रगत भारत । pragatbharat.com)
Canada Cold Video : इथं भारतात यंदाच्या वर्षी अपेक्षित हिवाळा जाणवलाच नाही, असं म्हटलं जात असतानाच जगाच्या एका भागात मात्र आलेल्या हिमवादळानं संपूर्ण देशच थांबवल्याची दृश्य समोर आली आहेत. जास्त थंडी म्हणजे नेमकी किती थंडी? हाडं किंवा रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? दाकखिळी बसते म्हणजे नेमकं काय होतं? या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास तुम्ही कॅनडातील सद्यस्थितीची दृश्य पाहू शकता. कारण, आर्क्टिक ब्लास्टमुळं (Arctic Blast) सध्या कॅनडामध्ये (Canada Video) थंडीचा कडाका इतक्या गंभीर वळणावर पोहोचला आहे की दैनंदिन जीवनातील कामांवर, वाहतुकीवर आणि जनजीवनावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.
बीबीसी या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमुळं कॅनडातील वास्तव समोर आलं आहे. उपलब्ध माहिती आणि वृत्तांनुसार सध्या कॅनडामध्ये थंडीचा कडाका इतका वाढला आहे की, तव्यावर फोडलेलं अंड असो किंवा मग टेबलावर एका Bowl मध्ये ठेवलेले नूडल्स असो सर्वकाही गोठलं आहे. इतकंच काय तर, इथं Tissue आणि टॉयलेट पेपरही गोठला आहे. ही AI जनरेटेड दृश्य नसून कॅनडामध्ये प्रत्यक्षात निसर्गाचं हे रुप पाहायला मिळत आहे.