Ram Mandir Pratisthapana first picture ayodhya marathi news first appearance of Lord Sri Rama first picture of Ramlala’s idol

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्या (Ayodhya) नगरी सजली आहे. राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामललाच्या (Lord Sri Rama) मूर्तीचे पहिले चित्र समोर आले आहे. 

 

Ram Mandir Ayodhya: प्रभू श्रीरामाचं पहिलं रुप! रामललाच्या मूर्तीचे पहिले चित्र समोर, तुम्हीही घ्या दर्शन

 

भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.  राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आलं आहे. आता फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला असून 22 जानेवारी रोजी, देशातील प्रत्येकजण रामललाचा अभिषेक सर्वांनाच पाहता येणार आहे.

 

Ram Mandir Ayodhya: प्रभू श्रीरामाचं पहिलं रुप! रामललाच्या मूर्तीचे पहिले चित्र समोर, तुम्हीही घ्या दर्शन

अनेकजण अयोध्येच्या दिशेनं रवाना, ‘हाफ डे’ ची घोषणा 

प्रभू रामांचा हा भव्य सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी अनेकजण अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत. आता काही दिवस बाकी असून 22 जानेवारीला रामललाची विधीवत पूजा अर्चांसह अभिषेक करण्यात येणार आहे, त्यानंतर अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अशातच या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत ‘हाफ डे’ ची घोषणा केली आहे.

 

Ram Mandir Ayodhya: प्रभू श्रीरामाचं पहिलं रुप! रामललाच्या मूर्तीचे पहिले चित्र समोर, तुम्हीही घ्या दर्शन

 

फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

गुरुवारी, 18 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे. गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला होता. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार आहेत.

 

सुरक्षा व्यवस्थेकडेही विशेष लक्ष

या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली जात आहेत. यामध्ये ज्येष्ठ राजकारणी, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, अभिनेत्री आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर या काळात अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने अयोध्येला पोहोचतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्थेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. या कार्यक्रमाला हजारो व्हीव्हीआयपीही उपस्थित राहणार आहेत.

 

 

हेही वाचा>>>

अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस तिकीट? लवकरच लाभ घ्या, ऑफर मर्यादित कालावधीसाठी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts