Ayodhya Ram Mandir Inauguration Ram Mandir pran pratishtha bollywood actots and sports persons celebrities got invitation see list marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya) 22 जानेवारीला रामललाचा (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरातील रामभक्त या क्षणाची वाट पाहत आहे. देशभरातील संत-महंत, कलाकार, नेते मंडळीसह उद्योगपतींना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजरमान झाले आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्वांना प्रभू श्रीरामाच्या मनमोहक रुपाचं दर्शन होणार आहे.

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रितांची यादी 

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. या समारंभासाठी आमंत्रित केलेल्या सुमारे 8,000 लोकांच्या लांबलचक यादी आहे. या पाहुण्यांच्या यादीत प्रमुख राजकीय नेते, मोठे उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू आणि मुत्सद्दी यांचा समावेश आहे.

सेलिब्रिटींची मांदीयाळी

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमिताभ बच्चन खासगी विमानाने अयोध्येत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठीच्या निमंत्रितांच्या यादीत चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजय देवगण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, मोहनलाल, अनुपम खेर, चिरंजीवी आणि दिग्दर्शक संजय भन्साळी  यांचा समावेश आहे. याशिवाय सरोद वादक अमजद अली, गीतकार मनोज मुंतशीर आणि त्यांची पत्नी, गीतकार आणि लेखक प्रसून जोशीआणि चंद्रप्रकाश द्विवेदी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

‘या’ उद्योगपतींना निमंत्रण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे, यामध्ये त्यांची आई कोकिलाबेन, पत्नी नीता, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका आणि भावी सून राधिका मर्चंट यांचीही नावे यादीत आहेत. निमंत्रित इतर प्रमुख उद्योगपतींमध्ये आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांची पत्नी नीरजा, पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, महिंद्रा अँड महिंद्राचे आनंद महिंद्रा आणि DCM श्रीरामचे अजय श्रीराम आणि TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) के. कीर्तिवासन यांचा समावेश आहे.

ऐतिहासिक कार्यक्रमाची तयारी पूर्ण 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, ”प्रभू श्रीरामलचाचा अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे संपूर्ण अयोध्या धाम, उत्तर प्रदेश आणि देशात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक शतकांनंतर येणारा हा क्षण पाहण्यासाठी भाविक आतूर झाले आहे. भारताचा विश्वास, विश्वास आणि अभिमान पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा कार्यक्रम आहे. उत्तम समन्वय, स्थानिक पातळीवर ट्रस्टशी समन्वय, सुविधा, वाहतूक, सुरक्षा आदींच्या माध्यमातून 22 जानेवारीचा ऐतिहासिक कार्यक्रम भव्य, दिव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे.”

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts