Ncp Political Crisi Result of the Hearing Likely to Be Delayed New Schedule Has Been Announced by Speaker Rahul Narwekar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis)  पक्षाची विधानभवनात सुनावणी पार पडली आहे. राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर  शक्यता आहे.  विधानसभा अध्यक्षांकडून (Rahul Narwekar)  नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.  दोन्ही गटाची संमती घेवून सुप्रीम कोर्टाकडे विधीमंडळाकडून मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. नव्या वेळापत्रकाबाबत सुनावणीदरम्यान चर्चा  झाली.  दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल,असे अध्यक्षांचे मत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानभवनातील आजची सुनावणी संपली आहे.  आज नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे . 23, 24 जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी होणार आहे. 25 जानेवारीला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यापुढे दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार आहे.   29 आणि 30  जानेवारीला   दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडणार आहे. 31 जानेवारील सुनावणी पूर्ण होईल त्यापुढे  आठ ते 10 दिवसात अंतिम निकाल जाहीर करणार आहे . 

31 जानेवारीनंतर 10-15 दिवसात माझा निर्णय देईल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार मला सगळ्यांचं म्हणणं 31 जानेवारीपर्यंत ऐकून घ्यावे लागणार आहे. 31 जानेवारीला सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर 10-15 दिवसात माझा निर्णय मी देईल. 23 किंवा 24 तारखेला आपण दोन्ही बाजू ऐकून घेणार आहे. 25 तारखेला आपण क्रॉस विटनेस करणार आहे.  31 तारखेला आपण ही सुनावणी पूर्ण करू. चार  दिवस तयारीला दिले जातील.

अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता 

अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर केलंय.  या प्रतिज्ञापत्रामध्ये  शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आलाय.  शरद पवार कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राजकीय वर्तुळात हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण अद्यापही हा निकाल लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची धाकधूक सध्या वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरु असलेली  सुनावणी  आठ डिसेंबरला  पूर्ण झाली आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts