Horrible Accident Overspeed Truck Overturned On Car Seven Died With Children MP News; लग्नाच्या वऱ्हाडावर ट्रक येऊन उलटला, दोन चिमुरड्यांसह सात जणांचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोपाळ: मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला. येथे सिधी-टिकरी मार्गावरील डोळ गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन थेट एका कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ जून) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सिधी मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या टिकरी पोलीस चौकी अंतर्गत डोल गावात खड्ड्यात अडकल्याने एक अनियंत्रित ट्रक अचानक कारवर उलटला. यावेळी कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. ही कार लग्नाचं वऱ्हाड घेऊन परतत असताना हा भीषण अपघात घडला. यादव यांच्या घरातील लग्नाचं हे वऱ्हाड होतं. ते सिरसी ते कुंदर कुश्मीपर्यंत गेली होती. येथून परतत असताना गावात पोहोचण्यापूर्वीच गाडी डोलमध्ये उभी होती. तेवढ्यात हा अपघात झाला.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं
घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, कार रस्त्याच्या कडेला उभी होती आणि सर्व लोक त्यात बसले होते. काही वेळात समोरून येणारा अनियंत्रित ट्रक कारवर उलटला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. त्यात बसलेले लोक दबले गेले. यानंतर सर्वांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर सात मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. एवढा भीषण अपघात कसा घडला, याबाबत पोलीस अधिकारी तपासात गुंतले आहेत.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

पीसीसी प्रमुख कमलनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट केले- सिधी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात दोन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी

[ad_2]

Related posts