Indian Railways New Rules For Children, मुलांबाबत रेल्वेने घेतला मोठा निर्णय! आता आई अन् बाळाचा प्रवास सुखकर होण्यासाठी विशेष ‘बेबी बर्थ’ – indian railways’ decision to make seat a foldable baby berth

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : मेल-एक्स्प्रेसने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या आईचा आणि बाळाचा प्रवास सुखकर होण्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी डब्यात विशेष ‘फोल्डेबल बेबी बर्थ’ बनवण्यासाठी रेल्वेच्या वतीने सुरू असलेले मंथन अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रस्तावित बेबी बर्थची अंतिम चाचणी लवकरच सुरू केली जाईल. त्यानंतर सर्व डब्यांमध्ये असे बेबी बर्थ बसविण्याच्या योजनेला चेन्नईतील रेल्वे कोच कारखान्यात सुरुवात होईल, असे रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले. या बेबी बर्थची संकल्पना नंदुरबारचे प्रा. नितीन देवरे आणि हर्षाली देवरे या मराठी दाम्पत्याची आहे.

फोल्डेबल बेबी बर्थचे संशोधन

प्रा. देवरे यांनी मागच्या वर्षी फोल्डेबल बेबी बर्थचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रकल्प प्रथमतः योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व जी-२० अंतर्गत येणाऱ्या लाइफ-२०चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. गजानन डांगे यांना दाखवला. त्यानंतर भाजप खासदार व रेल्वे संसदीय समितीचे सदस्य सुमेरसिंग सोळंकी यांच्यासमोर त्यांनी सादरीकरण केले. सोळंकी यांनी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी त्याबाबत चर्चा केली. नंतर देवरे यांना दिल्लीत बोलावण्यात आले. तिथे त्यांनी वैष्णव व रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमोर याचे सादरीकरण केले. वैष्णव यांना हा प्रकल्प इतका आवडला, की त्यांनी हा प्रस्तावित बेबी बर्थ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. मे २०२२मध्ये नवी दिल्ली-लखनौ या लखनौ मेलमध्ये फोल्डेबल बेबी बर्थची चाचणी सुरू झाली.

सध्या रेल्वेच्या आसनावर कमी जागा असल्याने आई आणि बाळाला एकत्र प्रवास करणे अडचणीचे ठरते. ही समस्या लक्षात घेऊन देवरे दाम्पत्याने ‘बेबी बर्थ’चा आराखडा तयार केला. त्याची पहिली चाचणी झाल्यावर सोशल मीडियावर कौतुकासोबतच या संकल्पनेतील उणिवाही समोर आल्या. देवरे यांनी मागच्या आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नवीन आराखडा सादर केला.

प्रवासात किती मद्य घेऊन जाऊ शकता? ​रेल्वे नियम काय सांगतो, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड
असा असेल ‘बेबी बर्थ’

– पहिल्या संकल्पनेनुसार सीटच्या खालच्या बाजूला घडी घातला जाणारा बेबी बर्थ नवीन आराखड्यात खुला ठेवला होता.
– नवीन आराखड्यानुसार तो सुरक्षित पडद्याने झाकलेला असेल.
– मुख्य आसनासोबत बेबी बर्थ आणखी मजबूतपणे बांधलेला आहे.
– लखनौ मेलमधील चाचणी यशस्वी ठरल्यानंतर सुधारित आराखडा रेल्वेने मंजूर केल्यानंतर नवीन कोचमध्ये ही सुविधा सुरू केली जाऊ शकते.

[ad_2]

Related posts