‘माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ मुलाखत पाहून 84 वर्षांच्या आजी हळहळल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयमी कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे. त्याबरोबरच तो लिखाण, दिग्दर्शन, कविता लेखन आणि सूत्रसंचालनही करतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकतंच संकर्षणने एक अनुभव शेअर केला आहे. 

संकर्षण हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एका 84 वर्षांच्या आजींचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या आजी युट्यूबवर संकर्षणची मुलाखत पाहताना दिसत आहे. त्याने या फोटोला भावूक कॅप्शन दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

मी मध्यंतरी “व्हाय फळ” नावाच्या You Tube चॅनेलसाठी सुयोग, प्राची सोबत जाउन गप्पा मारल्या.. खरं सांगू… वेगवेगळ्या देशांतल्या मराठी लोकांनी मला मुलाखत आवडल्याचे मेसेजेस, फोन्स केले… पण काल हा फोटो आला .. Instagram वर कुणीतरी मला मेसेज करुन सांगीतलं कि , माझ्या ८४ वर्षांच्या आज्जीने तुझी २ तासांची मुलाखत मन लाऊन , सलग पाहिली आणि तीला खूssssप आवडली.. ती म्हणाली हे त्याला सांग, माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो …. !! कित्ती गोड फोटो आहे हा

मी ह्या मुलाखतीसाठी “सुयोग प्राची” चे , मला मेसेजेस केलेल्या , नं केलेल्या , खूप , सग्गळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो..! माझ्यावर , माझ्या कामावर प्रेम करत रहा , मी निराश करणार नाही, असे संकर्षणने म्हटले आहे. 

संकर्षणच्या या पोस्टवर अभिनेता जितेंद्र जोशीने कमेंट केली आहे. यासारखा दुसरा पुरस्कार नाही, अशी कमेंट जितेंद्र जोशीने केली आहे. तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने फारच छान मुलाखत झाली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. सध्या संकर्षण हा विविध नाटकांमध्ये झळकत आहे. ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ या तीन नाटकांचे प्रयोग सध्या सुरु आहेत. त्याच्या या सर्व नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Related posts