[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ayodhya Ram Mandir : प्रतीक्षा संपणार, प्रभू श्रीराम विराजमान होणार, Vivek Oberoi आणि Madhur Bhandarkar यांची प्रतिक्रिया
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये भव्य प्रभू श्रीराम मंदिरात (Ram Temple) रामललाच्या (Ram Lalla) अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha ) कार्यक्रमाला आता फक्त एक दिवस उरला आहे. याआधी राम मंदिरात (Ram Temple) विशेष विधी सुरू आहेत. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंबंधित विधींचा सहावा दिवस आहे. आज रविवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला 114 कलशांच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे. आज रामललाच्या मंडपाचीही पूजा केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
114 कलशांतील पाण्याने रामललाला स्नान
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘रविवारी प्रस्थापित देवतांची दैनंदिन पूजा, हवन, पारायण, पहाटे मध्वधिवास, 114 कलशांतील विविध औषधी पाण्याने मूर्तीचे स्नान, महापूजा, उत्सव, मूर्तीच्या प्रसादाची प्रदक्षिणा, शय्याधिवास, तत्लन्यास, महान्यास. तेथे आदिन्य, शांत-पोषक – अघोर होम, व्याहती होम, रात्री जागरण, संध्याकाळची पूजा आणि आरती होईल.’
[ad_2]