Ayodhya Ram Mandir Inauguration Ram temple able to face every storm will not be damaged for 1000 years marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir Inauguration : देशाच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 ही तारीख सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पाचशे वर्षांपासून सुरू असलेला वाद संपला असून मंदिराचे स्वप्न सत्यात उतरलं आहे. बांधकामाचा उत्कृष्ट नमूना ठरणाऱ्या या राम मंदिराला पुढची 1000 वर्षे काहीही होणार नाही, प्रत्येत वादळाचा सामना करण्यासाठी हे मंदिर सक्षम असल्याचा दावा देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी L&T ने केला आहे.

या मंदिराच्या निर्मितीसाठी एल अँड टी कंपनीने त्याची रचना आणि साहित्य अशा प्रकारे निवडले आहे की कोणत्याही काळाचे वादळ त्याची नासधूस करू शकणार नाही. ते बनवताना देशाची संस्कृती, कला आणि लोकांच्या भावना यांची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही याला दुजोरा दिला आहे.

तीन मजली मंदिरात पाच मंडप आणि मुख्य शिखर

श्री रामजन्मभूमी मंदिर अयोध्येत सुमारे 70 एकर परिसरात पसरले आहे. त्याची वास्तू नगर शैलीची आहे. त्याच्या उत्कृष्ट रचनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे मंदिर 161.75 फूट उंच, 380 फूट लांब आणि 249.5 फूट रुंद आहे. तीन मजली असलेल्या या मंदिरात पाच मंडप आहेत. हे नृत्य मंडप, रंग मंडप, गुढ मंडप, कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप म्हणून ओळखले जातील. एक मुख्य शिखर देखील आहे.

मंदिर म्हणजे अभियांत्रिकी चमत्कार

L&T चे अध्यक्ष आणि MD SN सुब्रह्मण्यन म्हणाले की, हा प्रकल्प देशाला समर्पित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला श्रीरामजन्मभूमी मंदिराची रचना आणि बांधकाम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार, श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, नृपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांचे आभार मानतो. या सर्व लोकांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा अभियांत्रिकी चमत्कार घडवू शकलो. अभियांत्रिकेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक ठरेल. 

श्रीराम मंदिराची वैशिष्ट्ये

राम मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून गुलाबी बन्सी पहारपूरचे दगड आणले आहेत. हे मंदिर सर्वात शक्तिशाली भूकंप देखील सहजपणे सहन करण्यास सक्षम असेल. मंदिराच्या प्रत्येक बाजूला 390 खांब आणि 6 मकराना संगमरवरी खांब आहेत. त्यामध्ये 10 हजारांहून अधिक शिल्पे आणि थीम कोरण्यात आल्या आहेत. 

मे 2020 पासून मंदिराचे बांधकाम सुरू झाले. त्याच्या पायाभरणीसाठी आयआयटीसारख्या संस्थांचीही मदत घेण्यात आली. L&T चे वरिष्ठ उपाध्यक्ष एम.व्ही. सतीश म्हणाले की, या मंदिराचा प्रत्येक दगड अतिशय काळजीपूर्वक आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून बसवण्यात आला आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts