Ayodhya Ram Mandir LIVE Updates Ram Temple Inauguration Grand Opening Live Consecration Ceremony Photos Videos PM Modi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir LIVE: ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येत (Ayodhya) आज पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील तयारी पूर्ण झाली आहे. गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

>> रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा मुहूर्त कोणता?

अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.29 मिनिटांच्या मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल. अवघ्या 32 सेकंदाचा मुहूर्त या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आला आहे. तसेच मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त असणार आहे. 

>> प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?

सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय. 

>> असे असतील विधी

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होण्याआधी रविवार 21 जानेवारी रोजी यज्ञविधी, विशेष पूजा आणि हवन करण्यात येणार आहे. तसेच 125 कलशांसह रामललाला दिव्य स्नान घालण्यात येईल. त्यानंतर 22 जानेवारी रोजी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात महापूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी  12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. 

>> अशी आहे रामाची मूर्ती

मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता

प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण

पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार

दुधाचा, पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम नाही

मूर्तीची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही 

पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंची

मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे

डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे

प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत.

भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे

कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती

मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट

एका बाजूला गरूड, दुसऱ्या बाजूला हनुमान

ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली

प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाची

>> मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार

मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंहाचा अवतार

मूर्तीवर वामन, परशुराम, राम,अवतार

कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार

 

[ad_2]

Related posts