Dehradun IMA Lieutenant Colonel Court Martialled who donated sperms to lady clerk wife of army havildar after affair; हवालदाराच्या पत्नीशी प्रेमसंबंध, अपत्यप्राप्तीसाठी स्पर्मदान, लेफ्टनंट कर्नलचे कोर्टमार्शल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डेहराडून: इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) डेहराडून येथे तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नलचे अकादमीतील महिला लिपिकाशी प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल आणि तिच्या इन-व्हिट्रो प्रजनन उपचारांसाठी शुक्राणू (स्पर्म) दान केल्याबद्दल लष्कराने कोर्टमार्शल केले आहे.

या अधिकाऱ्याचे जनरल कोर्ट मार्शल रुरकी येथील बंगाल इंजिनीअर ग्रुप अँड सेंटरमध्ये सात जून रोजी संपले. सर्व आरोपांत तो दोषी ठरला आहे. अधिकाऱ्याला कोर्ट मार्शलद्वारे कठोर शब्दात फटकारण्यात आले आहे. याशिवाय लेफ्टनंट कर्नलसारख्या महत्त्वपूर्ण पदावरुन तीन वर्षांची सेवाजप्ती, तीन वर्षांची सेवाज्येष्ठता जप्ती आणि वाढीव वेतनासाठी तीन वर्षांची सेवाजप्ती या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.

संबंधित लेफ्टनंट कर्नल हे आर्मी एज्युकेशन कॉर्प्सचे असून आयएमए डेहराडूनच्या शैक्षणिक शाखेत नियुक्त झाले होते. आयएमएमध्ये काम करणार्‍या महिला लिपिकाशी त्यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यावेळी ती महिला अभियंता कॉर्प्सच्या हवालदाराशी विवाहबद्ध होती. लेफ्टनंट कर्नल देखील विवाहित होते आणि त्यांना दोन मुले आहेत.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे उघड झाले की, महिलेला गर्भधारणेसाठी इन-विट्रो प्रजनन उपचारांना नेताना अधिकाऱ्याने अनेक वेळा तिला सोबत दिली होती आणि त्यासाठी आपले शुक्राणू दानही केले होते. आयएमए डेहराडूनमधून बाहेर पोस्टिंग झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नलने महिलेशी सर्व संपर्क तोडला. तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदवली.

भाच्याने अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेलिंगमुळे मामीने जीवन संपवलं; भाचा म्हणतो, तीच मला…
आरोपी अधिकाऱ्याचा बचाव अलाहाबाद उच्च न्यायालयातील शैलेंद्र कुमार सिंग आणि केशव शर्मा या दोन वकिलांनी केला. कर्नल वीरेंद्र सिंग (निवृत्त), माजी जज अॅडव्होकेट जनरलचे शाखा अधिकारी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या वकिलाने हा खटला चालवला.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

लेफ्टनंट कर्नलने सुरुवातीला आर्मी अॅक्टच्या कलम ४५ आणि ६३ नुसार अधिकारी म्हणून असभ्य वर्तन केल्याबद्दल आणि लष्करी शिस्तीला प्रतिकूल कृत्य केल्याबद्दल त्याच्यावर लावण्यात आलेल्या तीनही आरोपात दोषी नसल्याचं सांगितलं.

CCTV : मेट्रो येताना दिसली, नवऱ्याने बायकोला उचललं आणि रुळांवर झोकून दिलं, क्षणार्धातच…

लिपीक महिला ही लष्कराच्या हवालदाराशी विवाहित असल्याचे माहित असूनही तिच्याशी प्रेमसंबंध ठेवल्याचा एक आरोप आहे, तर दुसरा आरोप सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान प्रक्रियेसाठी महिलेला आपले स्पर्म दान करण्याशी संबंधित आहे. तर तिसरा आरोप महिला ही आपली पत्नी असल्याचं दाखवणारे अयोग्य डिपेंडंट कार्ड बनवण्याशी संबंधित आहे.

घरात मुलाच्या विवाहाचा मांडव, जावई दुसऱ्या लग्नासाठी अडून बसला, सासऱ्याने जीव गमावला

आरोपी आणि महिला यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि फोन रेकॉर्डिंगच्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक पुराव्यासह तीन आरोपांचा तपशील फिर्यादींनी दिल्यानंतर, लेफ्टनंट कर्नलने दोषी नसल्याची याचिका मागे घेतली. सर्व आरोपांसाठी दोषी असल्याचे कबूल केले.

[ad_2]

Related posts