morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 23rd January 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील… 

Ram Mandir Darshan: आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं, दिवसातून तिनदा होणार आरती, कडाक्याच्या थंडीतही मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी

Ram Mandir: अयोध्या : देशाविसायांचं तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रभू श्रीराम (Shree Ram) अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले. काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला. अभिषेक सोहळ्यानंतर आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांना घेता येणार आहे. रामभक्त आजपासून मंदिरात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. अभिषेक सोहळा संपन्न झाल्यापासूनच दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अयोध्येतील पारा 6 अंशावर आहे. अत्यंत कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. वाचा सविस्तर

चीनमध्ये 7.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; राजधानीही हादरली, दिल्लीकर धास्तावले

Delhi Earthquake Reactor Scale: नवी दिल्ली : भूकंपाच्या धक्क्यांनी चीन (China) सोमवारी रात्री उशिरा हादरुन गेलं. चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती, भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होतो की, याची तीव्रता थेट भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली. सोमवारी रात्री उशीरा दिल्लीकरांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली, भूकंपाचं केंद्र नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचं सांगितलं जात आहे. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता एवढी होती की, लोक घाबरुन आपल्या घरांच्या बाहेर पडले. वाचा सविस्तर 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts