[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ayodhya Ram Mandir Trust : 500 वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राम मंदिरात (Ram Temple) विराजमान झाले. न भुतो, न भविष्यति, असा भव्य-दिव्य सोहळा अयोध्येत पार पडला. सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामाची विधीवत प्राणप्रतिष्ठा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. देशभरात याचा जल्लोष साजरा करण्यात आला. प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमात देशाच्या नाकोपऱ्यातील पाहुणे सहभागी झाले होते. या पाहुण्यांमध्ये साधूसंत, राजकीय व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांचाही समावेश होता. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अयोध्येतील राम मंदिर बांधणीसाठी राजकारणी, सेलिब्रिटी यांच्यासह अनेक उद्योगपतींनी दान दिलं आहे. राम मंदिरासाठी देशभरातील दिग्गज उद्योगपतींनी देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी कोणत्या अब्जाधीशाने, किती देणगी दिली, हे जाणून घ्या.
राम मंदिरासाठी अंबानी कुटुंबाकडून किती दान? (Ambani Donation for Ram Mandir)
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची पत्नी नीता, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका मेहता आणि भावी सून राधिका मर्चंट पोहोचले होते. मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स इन्डस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपयांची देणगी दिली आहे, असं अंबानी कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अंबानी कुटुंबाने राम मंदिरासाठी आतापर्यंत 10 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा दावा केला जात आहे.
राम मंदिरासाठी व्यापारी, उद्योगपतींकडून दान (Donation for Ayodhya Ram Temple)
सुरतमधील एका व्यावसायिकाने राम मंदिरासाठी आतापर्यंत सर्वाधिक देणगी दिली आहे. दिलीप कुमार लाखी असे या हिरे व्यापाऱ्याचे नाव असून त्याने 101 किलो सोने मोठ्या प्रमाणात दान केले आहे. त्याची किंमत अंदाजे 68 कोटी रुपये आहे. दिलीप कुमार व्ही लाखी आणि त्यांच्या कुटुंबाचा सुरतमध्ये सर्वात मोठा हिऱ्यांचा कारखाना आहे. या सोन्याचा वापर दरवाजा, त्रिशूळ आणि डमरूमध्ये करण्यात आला आहे. गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनीही राम मंदिरासाठी मोठी देणगी दिली आहे. गोविंदभाई ढोलकिया हे हिरे कंपनी श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक आहेत. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
अदानींकडून राम मंदिरासाठी किती देणगी (Adani Donation for Ram Mandir)
राम मंदिराच्या उभारणीसाठी उद्योगपती अदानी समुहाचे मालक गौतम अदानी यांनी किती देणगी दिली आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अदानी ग्रुपच्या अदानी विल्मर या कंपनीने फॉर्च्यून ब्रँडसह अभिषेक समारंभासाठी प्रसाद तयार केला. याशिवाय, मंदिरातील लाईटींग जबाबदारी हॅवेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने घेतली. हॅवेल्स इंडियाचे अध्यक्ष पराग भटनागर यांनी सांगितलं की, आमच्या कंपनीने राम मंदिराच्या लाईट व्यवस्थेचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
राम मंदिरासाठी मोरारी बापूंकडून सर्वाधिक देणगी (Morari Bapu Donation for Ram Mandir)
मीडिया रिपोर्टनुसार, राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कुण्या उद्योगपतीने नाही, तर राम कथा वाचक मोरारी बापू यांनी दिली आहे. मोरारी बापू गुजरातमधील आध्यात्मिक गुरु आणि राम कथा वाचक आहेत. अहवालानुसार, मोरारी बापूंनी राम मंदिरासाठी 16.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय राम मंदिरांनीही देणगी दिली आहे. पाटण्याच्या महावीर मंदिराने राम मंदिराच्या उभारणीसाठी 10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
अधिक पाहा..
[ad_2]