जर-तरला अर्थ नाही, मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा; शिष्टमंडळाच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहचले आहेत. मात्र, शिष्टमंडळासोबत कोणतेही चर्चा झालेली नाही. आपण आधी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत, त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेनंतरच पुढील निर्णय़ घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ओबीसीमधूनच्या आरक्षणावर आपण ठाम असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. 

दरम्यान पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, जर-तरला अर्थ नाही, आंदोलकांना मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा असे सांगणार आहे. निर्णय झाला तर ठीक अन्यथा चलो मुंबई यासाठी आम्ही तयार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे, जरांगे आणि शिष्टमंडळात होणारी बैठक महत्वाची ठरणार  आहे. 

मुंबईला जाण्याची हौस नाही

आज शिष्टमंडळ माझ्या भेटीसाठी आले होते. सकाळी आठ वाजता हे शिष्टमंडळ आले. मात्र, मी 10 वाजता उठलो. परंतु, आमची कोणतेही चर्चा शिष्टमंडळाशी झालेली नाही. मी आधी आमच्या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. आमची चर्चा झाल्यावर शिष्टमंडळ यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आमच्या वाहनांचे तोंड मुंबईकडे करून ठेवले जाणार आहे. निर्णय झाल्यावर आम्ही पुढे जाणार नाही. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts