Republic Day2024 No entry for vehicles on Futala Tight police presence in city on Republic Day maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur News नागपूर : यावर्षी स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) आपण साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. दरवर्षी फुटाळा तलाव (Futala) चौपाटी मार्गावर सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळते. सोबतच त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते.  त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 26 जानेवारीला फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

फुटाळ्यावर वाहनांना ‘नो एन्ट्री’

प्रजासत्ताक दिन असो  किंवा मग स्वतंत्रता दिवस, फुटाळा तलाव चौपाटी ही तरुणाईची कायम आवडते ठिकाण राहिले आहे. राष्ट्रीय सणाला या मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळत असते. मात्र मधल्या काळात या रस्तावर काही अतिउत्साही तरूणांकडून नियमांचे उल्लंघन करत वाहनांनी स्टंट केल्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत अशा स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांनी या मार्गावर सर्वच वाहनांना बंदी असल्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे 26 जानेवारीला सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांना फुटाळा तलाव परिसरात ‘नो एन्ट्री’ असेल.

असे असतील वाहतुक मार्गातील बदल

फुटाळा तलावाकडून अंबाझरीकडे जाणारे वळण ते फुटाळा तलाव टी-पॉईंटपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. सोबतच वाडी नाक्याकडून फुटाळा तलावामार्गे जाणारी वाहतूक जुना वाडी नाका ते रवीनगर या मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच भरतनगरकडून जाणारी वाहतूक अमरावती रोड / रवीनगर, महादेव मंदिर, वायुसेनानगर या मार्गे वळविण्यात येणार आहे. वायुसेना मार्ग ते फुटाळा तलाव ही वाहतूक महादेव मंदिर तेलंगखेडी मार्गे वळविण्यात येईल. 

मेट्रो प्रवाशांना 30 टक्के सूट

उद्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महा मेट्रो नागपूरकडून मेट्रो प्रवाशांकरिता 30 टक्के सूट देण्यात आली आहे.  प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना या सर्व कार्यक्रमात सहभागी होता यावे तसेच इतरत्र फिरणे अधिकच सोपे व्हावे, यासाठी मेट्रोने ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नागपूरकरांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Republic Day 2024 : यंदाचा प्रजासत्ताक दिन 75 वा की 76 वा? तुमचाही गोंधळ होतोय? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर…

  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts