[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील ओपन डेक बसेस हद्दपार झाल्या असल्या, तरी मुंबईकर, पर्यटकांसाठी १० ओपन डेक बसेस खरेदी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. ओपन डेक बस मध्ये लोअर डेक वातानुकूलित असणार आहे. यासाठी बुधवारी निविदा मागवण्यात आल्या असून, १० ओपन डेक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.
मुंबई दर्शन, हेरिटेज वास्तू पाहण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ओपन डेक बसेसची सुविधा उपलब्ध केली होती. परंतु ओपन डेक बसेसची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्या भंगारात काढण्यात आल्या. तर चार ओपन डेक बसेस पालिकेला देण्यात आल्या असून या बसेसचे जतन करत रेस्टॉरंट, वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.
परंतु मुंबईकर व पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या ओपन डेक बसेसचा प्रवास करता यावा यासाठी नव्याने १० ओपन डेक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या ओपन डेक बसेस मध्ये लोअर डेक वातानुकूलित असणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या ओपन डेक बसेसना मुंबईकर, पर्यटकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. रोज दीड ते दोन हजार प्रवासी ओपन डेक बसने मुंबई दर्शन घेत होते. ओपन डेक बसेसची उणीव भरून काढण्यासाठी १० ओपन डेक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. यासाठी बुधवारी निविदा मागवण्यात आल्या असून, पात्र निविदाकार कंत्राट देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा
तिकीट खिडक्यांवर टॉकबॅक यंत्रणा
स्थानिकांच्या दबावानंतर सायन पूल काही दिवसांसाठी खुला
[ad_2]