[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Palghar News : पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त करण्यासाठी या महामार्गाचे 130 किलोमीटरच्या काँक्रिटीकरणाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलं असून कामाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडून निष्काळजीपणा करत नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याच समोर आला आहे. काँक्रिटीकरण सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांमधून धोकादायक लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून यामुळे अपघातांना आमंत्रण दिलं जात आहे. धोकादायक पद्धतीने निघालेल्या लोखंडी सळ्या टायरला लागल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाले असताना देखील कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा बॅरीगेट्स ठेवण्यात आले नसल्याने प्रवाशी आणि वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
[ad_2]