BLOG by Chandrakant Shinde on Nitish Kumar will join NDA Again formula for formation of new government is fixed Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BLOG : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नितीश कुमार (Nitish Kumar) इंडी (ED) आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा सुरु झाली होती. तेव्हा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले होते की, नितीशकुमार इंडी आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नसल्याने त्यांना इंडी आघाडीत राहाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण एकाच महिन्यात नितीशकुमार यांनी डिसेंबरमधील ती चर्चा खरी असल्याचे सिद्ध करून दाखवले. नितीशकुमार पुन्हा एनडीएसोबत जाणार असल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. असे म्हटले जात आहे की नितीशकुमार रविवार 28 जानेवारी रोजीच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी नितीशकुमार यांनी रविवारचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.  

खरे तर भाजपशी लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनीच दीड वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. काँग्रेस, तृणमूलसह, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गटासह अनेक पक्षांना त्यांनी एकत्र आणले होते. या इडी आघाडीच्या काही बैठकाही झाल्या. 

नितीश कुमार यांना इडी आघाडीचे संयोजक बनवण्याचीही योजना आखण्यात आली होती. नितीश कुमार यांना मनातून इंडी आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावे असे वाटत होते. पण त्यांचा पूर्वेतिहास पाहाता त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकण्यास काँग्रेस व अन्य पक्ष तयार नव्हते. त्यामुळे नितीश कुमार  मनातून नाराज झाले होते. 

भाजपविरोधी आघाडीची आपणच सुरुवात केली पण आपल्यालाच त्यात स्थान नसल्याचे पाहून त्यांनी पवित्रा बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच  काँग्रेसही जागा वाटपात प्रादेशिक पक्षांना जास्त वाटा सोडून कुर्बानी देण्यास तयार नव्ह्ते. (याबाबत काही महिन्यांपूर्वीच ब्लॉग लिहून काँग्रेस छोट्या भावाची भूमिका घेणार का असा प्रश्न मी उपस्थित केला होता, आणि तो प्रश्न किती खरा होता ते आता सिद्धही झाले आहे.) या जागा वाटपामुळेच ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीतून बाहेर पडून पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घोषित केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी काँग्रेसला फक्त 4 ते 5 जागा देण्यास तयार झाल्या होत्या. काँग्रेस मात्र अर्ध्यापेक्षा जास्त जागांचा विचार करीत होते. त्यातच राहुल गांधींनी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर न्याय यात्रा सुरु केली. पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींची यात्रा जाणार असतानाही इंडी आघाडीतील एक पक्ष असलेल्या तृणमूलला काँग्रेसने यात्रेबाबत काहीही सांगितले नाही. याचाही ममता बॅनर्जी यांना राग आलाच होता. त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय सांगताना राहुल गांधींनी यात्रेबाबत न सांगितल्याने नाराजीही व्यक्त केली होती.यामुळे इंडी आघाडीला धक्का बसला आहे. मात्र उद्धव ठाकरे गटासह काही प्रादेशिक पक्ष ममता बॅनर्जी सोबत राहतील असेच वक्तव्य आजही करीत आहेत.

दुसरीकडे आपच्या अरविंद केजरीवाल यांनीही पंजाबमध्ये काँग्रेसला वाटा न देण्याचा निर्णय घेतला आणि आपली वेगळी वाट असल्याचे जाहीर केले.

बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या जेडीयूशी काँग्रेस तडजोड करण्यास तयार नसल्याचे चित्र होते. पण नितीश कुमार यांचे केवळ काँग्रेससोबतच नाते बिघडले असे नाही तर ज्या बिहारमध्ये ते सत्तेवर आहेत तेथेही लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीबरोबरही त्यांचे नाते बिघडण्याच्या मार्गावर होते. लालू आणि त्यांची मुले जेडीयूमध्ये पूट पाडून नितीश कुमार यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बिहारमध्ये बोलले जाऊ लागले होते आणि नितीश कुमार यांचे काही आमदार आरजेडीत पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचेही म्हटले जाऊ लागले होते. भाजप सोडून आरजेडीशी हात मिळवणी केल्यानंतरही आरजेडी दगाफटका करीत असल्याने नितीशकुमार नाराज झाले होते आणि म्हणूनच त्यांनी आरजेडीशी फारकत घेत भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.

स्वतःच्या फायद्यासाठी नितीशकुमार यांनी पलटी मारण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम 1994 मध्ये जनता दलापासून फारकत घेत समता पार्टी तयार केली. त्यानंतर 2003 मध्ये जनता दलयुनायटेड (जेडीयू)चीं निर्मिती केली आणि 2005 मध्ये भाजपसोबत युती केली. मात्र 8 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2013 मध्ये म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी फारकत घेतली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी काँग्रेससोबत संसार थाटला, मात्र दोन वर्षातच काँग्रेस सोडून 2017 मध्ये नितीशकुमार यांनी भाजपशी युती केली.

चार वर्षानंतर 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतली आणि लालूप्रसाद यादवयांच्या आरजेडीसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर मोदींविरोधात विरोधी पक्षांची आघाडी स्थापन केली, मात्र दीड वर्षातच नितीशकुमार पुन्हा भाजपच्या वळचणीला आले.

नितीशकुमार भाजपशी युती करीत असले तरी बिहारमधील काही भाजप नेते यावर नाराज आहेत. मात्र बिहारमध्ये भाजपला नितीशकुमार यांची आवश्यकता असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते नितीशकुमार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत. बिहारमध्ये भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवायचे आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून बिहारचे प्रख्यात नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आले. 

बिहारमध्ये भाजप मागासवर्गियांसाठी जास्त काम करून त्यांची जास्तीत जास्त मते स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. उपेंद्र कुशवाहा यांना जोवळ घेतल्यानंतर नितीशकुमारही भाजपसोबत आले तर केवळ लोकसभाच नव्हे तर 2025 मध्ये बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे बिहारमधील भाजप नेत्यांना जेडीयूबाबत काहीही न बोलण्याचा संदेश देण्यात आल्याचे समजते. 2025 पर्यंत नितीशकुमार यांनाच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसवून भाजप स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्याची परिस्थिती पाहाता भाजप बिहारमध्ये विधानसभा भंग करून तेथे लोकसभेबरोबर निवडणुका घेणार नाही. कारण असे झाले तर त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि सध्या तरी नरेंद्र मोदींना जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असल्याने बिहारमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही हे नक्की आहे.

ममता बॅनर्जीनंतर आता नितीशकुमार यांनीही इंडी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचे स्वप्न पाहात इंडी आघाडी स्थापन झाली खरी पण आता त्यात फूट पडू लागल्याने काँग्रेस काय करणार हा खरा प्रश्न आहे.

नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार, नव्या सरकारच्या स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts