Bhandara News bhandara Ordnance Factory massive explosion one worker died maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhandara News: भंडारा :  भंडारा (Bhandara) शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (Ordnance Factory) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सीएक्स विभागात हा स्फोट(Bhandara Ordnance Factory Blast) झाला.

या दुर्घटनेत अविनाश भागवत मेश्राम (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू झाली होती. सीएक्स विभागात बारुदचे कोट तयार करण्याचे काम केले जाते, तिथं हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्राम हे एकटेच होते. त्यामुळे त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

स्फोटामागील कारण अद्याप अस्पष्ट 

भंडारा शहरालगत जवाहरनगर असलेल्या आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डिनेंस फॅक्टरी) हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने या घटनेची गंभीर दाखल घेत आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधकांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सोबतच या समितीला अहवाल तत्काळ मागितला आहे. अहवालानंतरच या स्फोटाचं नेमक कारण पुढे येईल. यापूर्वी 2 जानेवारीला भंडारा शहरालग असलेल्या सनफ्लॅग कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. त्यामध्ये आठ कर्मचारी जखमी झाले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे.

महिन्याभरातील दुसरी घटना 

भंडाऱ्यातील  (Bhandara) सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत 2 जानेवारीच्या पहाटे मोठा स्फोट झाला होता.  या स्फोटात तीन कामगार जखमी झाले होते. सोबतच घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या इतर आणखी आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. सुदैवाने या स्फोटात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी अचानक झालेल्या या मोठा स्फोटामुळे चांगलीच तारांबळ उडाली. स्टील कंपनीत पहाटे झालेला हा स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आज परत एकदा हा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts