चालकाची एक चूक अन् फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार; VIDEO पाहून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल. 

नेमकं काय घडलं?

ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसयुव्हीने दोन मोटारसायकल आणि एका रिक्षाला धडक दिली. याशिवाय एका ट्रॅक्टरलाही ठोकलं. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, रस्त्यावरुन नियमितपणे वाहतूक सुरु होती. यादरम्या सिंगल लेनमधून निघालेली एक स्कॉर्पिओ वेगाने येते. स्कॉर्पिओची पुढे लोकांनी भरलेली एक रिक्षा होती. तसंच विरुद्ध दिशेने एक ट्रॅक्टर जात असतो. स्कॉर्पिओ वेगात असतानाच चालक रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पण या प्रयत्नात समोर वेगाने येणाऱ्या दुचाकीला ती धडकते. 

हा प्रहार इतका जबरदस्त होता की, स्कॉर्पिओच्या चालकाचं नियंत्रण सुटतं आणि पुढच्या रिक्षालाही धडकते. यामुळे रिक्षा पलटी होऊन रस्त्यावरुन खाली उतरते. दरम्यान घसरत जाताना स्कॉर्पिओ आणखी एका दुचाकीला उडवते. फक्त 2 ते 3 सेकंदात हे सगळं घडतं. 

अपघात इतका भीषण होता की, रस्त्याच्या शेजारी बसलेल्या काही लोकांनाही काही कळत नाही. दुचाकीस्वार तर धडकेमुळे रस्त्यावरच कोसळलेले दिसत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसर, रिक्षात एकूण 15 जण होते. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर इतर चौघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या अपघानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Related posts