[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अलपुझा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये महेशवर उपचार सुरु आहेत. महेश उपचारांना प्रतिसाद देत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. चार वर्षांची मुलगी नक्षत्राची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर महेशला मवेलिक्करा सबजेलमध्ये नेण्यात आलं.
बुधवार सात जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास महेशने चार वर्षांची लेक नक्षत्रा हिची हत्या केल्याचा आरोप आहे. महेशची ६२ वर्षीय आई सुनंदा मुलीसोबत शेजारीच राहते. घरातून मोठा आवाज ऐकून ती धावत महेशच्या घरात आली. त्यावेळी नक्षत्रा सोफ्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे तिला दिसले.
इतक्यात महेश तिथे आला आणि त्याने आईवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मदतीसाठा आरडाओरड करताच महेश घटनास्थळावरुन पसार झाला. सुनंदाच्या हाताला जखम झाली असून तिच्यावर मवेलिक्करा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महेशची पत्नी विद्या हिने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. परदेशी राहणारा महेश पिता मुकुंदन यांचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्यानंतर केरळात परतला. महेशच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पुनर्विवाह करायचा होता, मात्र महेशच्या स्वभावाविषयी समजल्यानंतर वधूपक्षाने लग्न मोडलं.
महेश आपल्या आयुष्यातील घटनांनी नाराज होता. दारुच्या नशेत असतानाच त्याने कुऱ्हाडीने वार करुन चार वर्षांची मुलगी नक्षत्रा हिचा खून केला. मात्र तिच्या हत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
[ad_2]