Nitish Kumar Bihar Chief Minister is likely to resign today and take oath as Chief Minister with BJP for the 9th time detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये (Bihar) आता सत्तापालट होणार असल्याची चिन्हं आहेत. दरम्यान बिहारचे मु्ख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आजच त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आलीये. तसेच रविवार 28 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता भाजपमध्ये सामील होऊन नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे बिहारच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांआधी मोठी उलथापालथ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून घेण्यात आला आहे. तरीही या संपूर्ण घडामोडींवर अद्याप आरजेडीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये. नितीश कुमार यांनी त्यांचा निर्णय घेतल्यानंतरच आरजेडीची रणनिती समोर येणार असल्याचं म्हटलं जातंय. 

जेडीयूच्या आमदारांनी दिले एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचे संकेत 

रविवार 28 जानेवारी रोजी जेडीयूच्या आमदारांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीतून बाहेर पडताना आमदारांनी जेडीयू एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचे संकेत दिलेत. दरम्यान रविवार 28 जानेवारी रोजी पुन्हा एक बैठक होणार असून त्यामध्ये या संदर्भात प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती देखील या आमदारांनी दिली. नितीश कुमार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. यामुळे दिल्लीपासून ते पाटणापर्यंत अनेक राजकीय घडामोडींना बराच वेग आल्याचं चित्र होतं. 

भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी आग्रह? 

बिहारमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे हे देखील शनिवार 27 जानेवारी रोजी बिहारमध्ये पोहचले होते. दरम्यान त्यानंतर भाजप आणि जेडीयूचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान सध्याही भाजप मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद या दोन महत्त्वाच्या पदांसाठी आग्रही असल्याचं सागंण्यात येत आहे. 

अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. तसेच लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी एकजूट दाखवली असून इंडिया आघाडीची देखील स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इंडिया आघाडीसाठी पुढाकार नितीश कुमार यांनीच घेतला होता. पण आता नितीश कुमार हेच भाजपमध्ये सामील होणार असल्यामुळे इंडिया आघाडीच्या भवितव्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

हेही वाचा : 

Nitishkumar : भाजप-जेडीयूचं ठरलं! नितीशकुमार कधी शपथ घेणार, समोर आली अपडेट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts