Nagpur Crime News Accused of murder released on parole attempted rape on Mother and minor daughter maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur News: नागपूर:   हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला एक गुन्हेगाराने पॅरोलवर बाहेर पडताच अजून एक मोठा गुन्हा (Crime) केला आहे. या आरोपीने ओळखीच्या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Nagpur Crime News) केला. या घटनेनंतर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कुणाल भारत गोस्वामी असे या 33 वर्षीय आरोपीची नाव असून तो नागपूरातील (Nagpur) जरीपटका येथील रहिवासी आहे.

अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचार

आरोपी कुणाल गोस्वामीने 2014 साली जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एक हत्या केली होती. ज्यामध्ये त्याला अटक झाली होती आणि तेव्हापासून तो शिक्षा भोगत आहे. एप्रिल 2023 मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला होता. दरम्यान, ओळखीतील एका महिलेकडे जात तिच्या घरी कुणीही नसताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने तिला गप्प राहण्यासाठी धमकी देखील दिली. पीडित महिलेने भीतीपोटी ही गोष्ट लपवून ठेवली. त्यानंतर आरोपी कुणाल परत जेलमध्ये गेला. मात्र काही दिवसांअगोदर कुणाल परत पॅरोलवर बाहेर आला आणि बाहेर आल्यावर त्याने परत एकदा तोच प्रयत्न केला. 

24 जानेवारीला त्याने संधीचा गैरफायदा घेत  महिलेचे घर गाठले. त्याने परत तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी पीडित महिलेची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी देखील घरी होती. कुणालाने तिच्यावर देखील अत्याचार केला. महिलेने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र हा सर्व प्रकार घडल्यानंतर अखेर महिलेने हिंमत दाखवत जरीपटका पोलिस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकार पोलिसांना सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी लगेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. 

तडीपार असूनदेखील शहरात फिरणाऱ्या आरोपीला अटक

तडीपार असूनदेखील नागपूर शहरात फिरणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. आकाश पुंडलिक ताकसांडे (वय 23, रा. तकिया, सरस्वतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हेगारी कारवायांसाठी त्याला 4 मे 2022 रोजी दोन वर्षांसाठी नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील तो शहरात येत होता. तो नागपुरात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्याला सापळा रचून शुक्रवारी रात्री पकडण्यात आले. त्याच्याविरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts